Navneet Rana | मोठी बातमी! नवनीत राणा आणि रवी राणांना कोर्टाचा मोठा धक्का

Navneet Rana | माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या खासगी घराबाहेर हनुमान चालिसा पठण (Hanuman Chalisa) प्रकरणात कोर्टाने निर्णय दिला आहे. रवी राणा आणि नवनीत राणा (Navneet Rana) यांची गुन्हा रद्द करण्याची मागणी करणारी याचिका कोर्टाने फेटाळली आहे. राणा दाम्पत्याला हा मोठा धक्का आहे.

Navneet Rana | राणा दाम्पत्याला मोठा धक्का

खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा यांना पुढील सुनावणीत कोर्टात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. याप्रकरणी मुंबई सत्र न्यायालात 5 जानेवारीला आरोप निश्चितीची प्रक्रिया होणार आहे. दोषमुक्ती यचिका फेटाळल्यानंतर कोर्टाकडून खटल्याच्या कारवाईला सुरूवात झाली आहे.

Navneet Rana | नेमकं काय आहे प्रकरण?

महाविकास आघाडी सरकारच्याकाळात राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’बाहेर हनुमान चालिसा पठणाचं आंदोलन अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा आणि त्यांच्या अपक्ष खासदार पत्नी नवनीत कौर राणा यांनी पुकारलं होतं.

मुंबईत दाखल झालेल्या राणा दाम्पत्य ाला कायदा आणि सुव्यवस्था न बिघडवण्याच्या कारणाखाली मुंबई पोलिसांनी हे आंदोलन न करण्याबाबत सीआरपीसी कलम 192 अंतर्गत नोटीस बजावली होती. मात्र तरीही याबद्दल मीडियात प्रक्षोभक वक्तव्य करणा-या राणा दाम्पत्य ाविरोधात मुंबई पोलिसांनी आयपीसी कलम 153A, 34,37 सह मुंबई पोलीस कायदा 135 अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.

23 एप्रिल, शनिवारी आंदोलनाच्या दिवशी संध्याकाळी या प्रकरणात राणा दाम्पत्याला खार पोलीसांनी अटक करून रविवारी वांद्रे दंडाधिकारी कोर्टापुढे हजर केलं. तेव्हा कोर्टानं त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानुसार राणांची कारागृहात रवानगी करण्यात आली. पुढे मुंबई सत्र न्यायालयानं या दोघांना सशर्त जामीन मंजूर केला होता.

महत्त्वाच्या बातम्या- 

Investment | दररोज ‘इतके’ रुपये वाचवून तुम्ही बनू शकता करोडपती

IPL 2024 Auction | बेंगलोरनं सोडल्यानं होता परेशान, पंजाबनं लावलेली बोली ऐकून उडाले होश!

Amitabh Bachchan यांनी अखेर सांगून टाकलं… म्हणाले, “हाच माझा खरा वारसदार!”

IPL Auction 2024 | ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या Pat Cumminsवर पैशांचा पाऊस, बोली थांबता थांबेना… शेवटी

IPL Auction 2024 | वर्ल्डकपच्या फायनलमध्ये भारताला नडला, आता भारतानंच केलं मालामाल