TMKOC च्या चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी समोर!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

TMKOC | ‘तारक मेहता का उल्टा चष्मा'(Tarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही लोकप्रिय मालिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. या मालिकेतील कलाकारांनाही प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. मात्र गेल्या काही दिवसांपासून या मालिकेतील अनेक कलाकारांनी मालिकेला रामराम ठोकला आहे.

दरम्यान, प्रेक्षक या मालिकेतील द्याबेनला पुन्हा पाहण्यासाठी आतूर झाले आहेत. काही दिवसांपूर्वी दयाबेन म्हणजेच दिशा वकानी कमबॅक करणार असल्याच्या चर्चा होत्या. पण आता या मालिकेत अभिनेत्रीची एन्ट्री होणार नसल्याचं निर्माते असित मोदी (Asit Modi) यांनी सांगितलं आहे.

काय म्हणाले असित मोदी?

एका मुलाखतीमध्ये बोलत असताना असित मोदी म्हणाले की, मी दिशा वकानीसोबत पुन्हा एन्ट्रीबाबत चर्चा केली. पुन्हा कमबॅक करण्यासाठी तिने होकार दिला होता. पण शेवटच्या क्षणी तिचा निर्णय बदलला. त्यामुळे मालिकेत तिची एन्ट्री झाली नाही.

या मागचं कारण म्हणजे दिशाचं कुटुंब आहे. तिला दोन लहान मुलं आहेत. तिच्या वैयक्तिक आयुष्याचाही आदर करायला हवा. पुढे ते म्हणाले की, आम्ही सध्या नव्या दयाबेनचा शोध सुरू केला आहे. त्याबद्दलच्या ऑडिशन देखील सुरू आहे.

नव्या दयाबेनची एन्ट्री?

असित मोदी पुढे म्हणाले की, जेव्हा दयाबेनच्या भूमिकेसाठी एखाद्या अभिनेत्रीची निवड होईल तेव्हा चाहत्यांसोबत नक्कीच ही आनंदाची बातमी शेअर केली जाईल.

खरं तर दिशाने आमच्यासोबत (tmkoc) पुन्हा काम करावं, अशी आमची इच्छा आहे. दिशाने कमाल काम केलं आहे. तिच्यापेक्षा अधिक चांगलं काम करणारं अद्याप आम्हाला कोणी सापडलेलं नाही. तर दुसरीकडे अंजलीची भूमिका साकारणारी अभिनेत्री नेहा मेहता(Neha Mehta) असो किंवा तारक मेहताची भूमिका साकारणारे शैलेश लोढा (Shailesh lodha) असो, या कलाकारांनी मालिका सोडल्यानं चाहते काहीसे नाराज आहेत.

News Title : shocking news for tmkoc fans

थोडक्यात बातम्या-

Aishwarya Rai ची ‘ही’ गोष्ट मला खटकते, बच्चन कुटुंबातील व्यक्तीने केला गौप्यस्फोट

Investment | दररोज ‘इतके’ रुपये वाचवून तुम्ही बनू शकता करोडपती

IPL 2024 Auction | बेंगलोरनं सोडल्यानं होता परेशान, पंजाबनं लावलेली बोली ऐकून उडाले होश!

Amitabh Bachchan यांनी अखेर सांगून टाकलं… म्हणाले, “हाच माझा खरा वारसदार!”

IPL Auction 2024 | ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या Pat Cumminsवर पैशांचा पाऊस, बोली थांबता थांबेना… शेवटी