Weather Update | काळजी घ्या! राज्याच्या ‘या’ भागात थंडी वाढणार

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Weather Update | गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशातील वातावरणामध्ये (Weather Update) मोठे बदल झाले आहेत. काही ठिकाणी थंडीचा कडाका वाढला आहे. आता पुढील काही दिवस थंडीचा कडाका राज्यातील अनेक भागांत जाणवणार आहे. उत्तर भारतात थंडी सुरु झाली आहे. त्या भागांत बर्फवृष्टी पडत आहे. यामुळे उत्तरेकडून थंड वारे वाहू लागले आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात होत आहे.

Weather Update | राज्यात थंडी वाढणार

महाराष्ट्रातील किमान तापमान सरासरी किंवा त्याखालची पातळी गाठेल आणि थंडीत वाढ होईल. विदर्भातील 11 तर खान्देशातील 3 जिल्ह्यांसह नाशिक, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, नांदेड, हिंगोली, परभणी या 22 जिल्ह्यांत थंडी जाणवणार आहे.

Weather Update | हवामान खात्याचा अलर्ट

दिवसाच्या थंडीबरोबर रात्रीच्याही थंडीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे आता स्वेटर आणि जॅकेट खरेदीसाठी गर्दी होणार आहे. मुंबईत सकाळी गार वारे वाहत आहेत. सध्या उत्तर महाराष्ट्रापेक्षा विदर्भात थंडी जास्त असल्याचे दिसून येत आहे. पुढील आठवडा राज्यात सर्वत्र हवामान कोरडे राहणार असल्याचा अंदाज पुणे हवामान विभागाने व्यक्त केला.

देशातील अनेक राज्यांमध्ये पाऊस पडल्यानंतर थंडी आणखी वाढणार आहे. येत्या काही दिवसात अनेक राज्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

Weather Update | Cold will increase in the state

महत्त्वाच्या बातम्या- 

TMKOC च्या चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी समोर!

Navneet Rana | मोठी बातमी! नवनीत राणा आणि रवी राणांना कोर्टाचा मोठा धक्का

Aishwarya Rai ची ‘ही’ गोष्ट मला खटकते, बच्चन कुटुंबातील व्यक्तीने केला गौप्यस्फोट

Investment | दररोज ‘इतके’ रुपये वाचवून तुम्ही बनू शकता करोडपती

IPL 2024 Auction | बेंगलोरनं सोडल्यानं होता परेशान, पंजाबनं लावलेली बोली ऐकून उडाले होश!