Maratha Reservation | मराठा आरक्षणाबाबत एकनाथ शिंदेंची सर्वात मोठी घोषणा!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Maratha Reservation | मराठा आरक्षणाबाबत गेल्या काही दिवसापांसून वातावरण तापलं आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला 24 डिसेंबरपर्यंत निर्णय घेण्यासाठी तारीख दिली आहे. दरम्यान, आज मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाबाबत एक महत्त्वाची घोषणा केली आहे.

एकनाथ शिंदेंची सर्वात मोठी घोषणा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सभागृहात आरक्षणाविषयी (Maratha Reservation) महत्त्वाचा मुद्दा मांडला. मराठा आरक्षणाविषयी बोलत असताना मुख्यमंत्री म्हणाले की, राज्य मागासवर्ग आयोग आपला अहवाल महिन्याभरात देणार आहे. आणि त्यानंतर मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारीत विशेष अधिवेशन घेतलं जाईल, अशी मोठी घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली.

याशिवाय, सरकारने मराठा आरक्षणासाठी आतापर्यंत केलेल्या कामांची माहिती दिली. तसेच मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी सरकारने घेतलेल्या विविध निर्णयांची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.

काय म्हणाले मुख्यमंत्री?

मुख्यमंत्री म्हणाले की, “मराठा समाजाला टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीतलं आरक्षण मिळवून द्यायचं आहे. राज्य सरकार सर्व शक्ती पणाला लावत आहेत. राज्य मागासवर्ग महिन्याभरात आपला अहवाल सादर करेल, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे.

पुढे ते म्हणाले की, अवलोकन केल्यानंतर, आवश्यकतेनुसार राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल आल्यानंतर फेब्रुवारीमध्ये विधी मंडळाचं विशेष अधिवेशन बोलवून आवश्यकतेनुसार मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल.

मराठा समाजाला आरक्षण देताना इतर कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही होणार याची खात्री देखील मी देतो, असं एकनाथ शिंदे सभागृहात म्हणाले.

News Title | Eknath shinde announcement on maratha reservation

थोडक्यात बातम्या-

Weather Update | काळजी घ्या! राज्याच्या ‘या’ भागात थंडी वाढणार

TMKOC च्या चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी समोर!

Navneet Rana | मोठी बातमी! नवनीत राणा आणि रवी राणांना कोर्टाचा मोठा धक्का

Aishwarya Rai ची ‘ही’ गोष्ट मला खटकते, बच्चन कुटुंबातील व्यक्तीने केला गौप्यस्फोट

Investment | दररोज ‘इतके’ रुपये वाचवून तुम्ही बनू शकता करोडपती