Variant JN.1 | ‘या’ वयोगटातील नागरिकांना मास्कची सक्ती; सरकारचा मोठा निर्णय

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Variant JN.1 | कोरोनाचे (Corona) नवे-नवे व्हेरिएंट येत असून संपूर्ण देशाच्या चिंतेत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. आता केरळात कोविड-19 चा सब व्हेरीएंट JN.1 (Variant JN.1) नावाचा नवा विषाणू सापडला आहे. यामुळे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात पुन्हा एकदा मास्क सक्तीचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

केरळ सरकारने Variant JN.1 मुळे राज्यातील नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. सरकारने नवीन नियमावली जाहीर केली आहे. केरळ सरकारने राज्यातील 60 वर्षांवरील नागरिकांना मास्क परिधान करणं बंधनकारक केलं आहे.

नव्या Variant JN.1 ने टेंशन वाढवलं

मरण पावलेल्यांमध्ये कोझिकोड जिल्ह्यातील वट्टोली येथील 77 वर्षीय कालियाट्टुपरमबथ कुमारन आणि कन्नूर जिल्ह्यातील पनूर येथील 82 वर्षीय पलक्कंडी अब्दुल्ला यांचा समावेश आहे. शुक्रवारी कुमारनच्या मृत्यूनंतर प्रयोगशाळेच्या चाचणीत त्याच्या मृत्यूचं कारण कोरोना असल्याचं समजलं.  शनिवारी कोझिकोड येथील एका खासगी रुग्णालयात खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होत असताना संसर्गामुळे अब्दुल्ला यांचा मृत्यू झाला.

भारतात सर्वात पहिले कुठे सापडला Variant JN.1?

सिंगापूरमधील एका भारतीय प्रवाशाला JN.1 संसर्ग झाल्याचे आढळून आले. ही व्यक्ती मूळची तामिळनाडूतील तिरुचिरापल्ली जिल्ह्यातील रहिवासी असून 25 ऑक्टोबर रोजी सिंगापूरला गेली होती.

तिरुचिरापल्ली जिल्ह्यात किंवा तमिळनाडूमधील इतर ठिकाणी JN.1 च्या संसर्गाची प्रकरणे नोंदवली जात असूनही, कोविड प्रकरणांमध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. भारतात JN.1 सब-व्हेरियंटची इतर कोणतीही प्रकरणे नोंदवली गेली नाहीत.

दरम्यान, तामिळनाडूमध्ये कोविडपासून बचाव करण्यासाठी सर्व खबरदारीच्या उपाययोजना सुरू झाल्या आहेत. आरोग्य मंत्री मा सुब्रमण्यम म्हणाले की, आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आवश्यक पावले उचलण्यास सांगण्यात आलं आहे आणि एखाद्या विशिष्ट भागात रुग्णांमध्ये वाढ दिसून आल्यास आणि तापाची प्रकरणे आढळल्यास, आरटीपीसीआर चाचण्या घेण्यात येतील.

महत्त्वाच्या बातम्या- 

Maratha Reservation | मराठा आरक्षणाबाबत एकनाथ शिंदेंची सर्वात मोठी घोषणा!

Weather Update | काळजी घ्या! राज्याच्या ‘या’ भागात थंडी वाढणार

TMKOC च्या चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी समोर!

Navneet Rana | मोठी बातमी! नवनीत राणा आणि रवी राणांना कोर्टाचा मोठा धक्का

Aishwarya Rai ची ‘ही’ गोष्ट मला खटकते, बच्चन कुटुंबातील व्यक्तीने केला गौप्यस्फोट