Rain Update | पुढील 24 तासांत अवकाळी पावसाचा इशारा!

Rain Update | मागील काही दिवसांपासून देशातील हवामानात मोठा बदल झाला आहे. अनेक राज्यांमध्ये हवामानाची विचित्र स्थिती पाहायला मिळत आहे. कुठे थंडीची लाट तर कुठे अवकाळी पावसाने राज्यांना झोडपून काढलंय. यामुळे नागरिकांचं प्रचंड नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय. अशात पुन्हा पाऊस हजेरी लावण्याची (Rain Update) शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Rain Update | पुढील 24 तासांत अवकाळी पावसाचा इशारा

पुढील 24 तासांत देशातील अनेक राज्यांमध्ये अवकाळी पाऊस (Heavy Rain) होईल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. आयएमडीने दक्षिणी तामिळनाडू, दक्षिण केरळ आणि लक्षद्वीपला अलर्ट जारी केला आहे. याठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस होईल, असं सांगण्यात आलं आहे.

उत्तर तामिळनाडू, उत्तर केरळ आणि अंदमान निकोबार बेटांवर हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज (Rain Alert) आहे. दुसरीकडे मागील दोन दिवसांत राजधानी दिल्लीतील तापमानाचा पारा घसरला आहे.

Rain Update  | ‘या’ भागांना झोडपून काढणार

एनसीआर, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि राजस्थानसह संपूर्ण उत्तर भारतातील भागात तापमानात घट दिसून आली आहे. त्यामुळे नागरिकांना हुडहुडी जाणवत आहे. पुढील चार दिवस दिल्लीतील ढगाळ वातावरण राहिल, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत पंजाब, हरियाणा-चंडीगढ-दिल्ली, उत्तर प्रदेशच्या काही भागांत 4 ते 8 अंश सेल्सिअस आणि उत्तर राजस्थानच्या अनेक भागांत 8 ते 11 अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवले गेलं.

दरम्यान, तामिळनाडूत अवकाळी पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. IMDच्या माहितीनुसार, मागील 24 तासात तामिळनाडूतील काही जिल्ह्यांमध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस झाला आहे.

Warning of unseasonal rain in the next 24 hours

महत्त्वाच्या बातम्या- 

Eknath Shinde | शेतकऱ्यांसाठी एकनाथ शिंदेंनी विधानसभेत केली मोठी घोषणा!

Dawood Ibrahim | पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड?; दाऊदबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती समोर

Maratha Reservation | मराठा आरक्षणाबाबत एकनाथ शिंदेंनी दिली मोठी अपडेट!

MPs Suspended | मोठी बातमी! लोकसभा अध्यक्षांचा विरोधकांना झटका

Sanjay Raut पुन्हा जेलमध्ये जाणार?; ‘या’ बड्या नेत्याच्या वक्तव्याने खळबळ