MPs Suspended | मोठी बातमी! लोकसभा अध्यक्षांचा विरोधकांना झटका

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

MPs Suspended | लोकसभेतील एकूण 33 खासदारांना निलंबित  करण्यात आलं आहे. यातील अनेक खासदारांना संपूर्ण अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आलं आहे. त्या निलंबित खासदारांची संख्या 47 झाली आहे.

MPs Suspended | लोकसभा अध्यक्षांची मोठी कारवाई

सोमवारी लोकसभेच्या कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी 34 विरोधी खासदारांना सभागृहातून निलंबित करण्यात आलं. निलंबित करण्यात आलेल्या खासदारांमध्ये काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी, द्रमुक खासदार टीआर बालू, दयानिधी मारन आणि तृणमूल काँग्रेसचे सौगता रॉय यांचा समावेश आहे.

31 खासदारांना हिवाळी अधिवेशनाच्या उर्वरित कामकाजासाठी निलंबित करण्यात आलं आहे. तसेच समितीचा अहवाल प्रलंबित राहिल्याने अन्य तीन खासदारांना निलंबित करण्यात आलं आहे. त्यांच्यामध्ये जयकुमार, विजय वसंत आणि अब्दुल खालिक यांचा समावेश आहे. हे सर्वजण घोषणाबाजी करत अध्यक्षांच्या आसनावर चढले.

लोकसभा अध्यक्षांनी नाव पुकारल्यानंतर संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी निलंबनाबाबतचा प्रस्ताव मांडला. त्यानंतर सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. यापूर्वी गुरुवारी दोन्ही सभागृहातील 14 खासदारांना निलंबित करण्यात आलं होतं. त्यात लोकसभेच्या 13 आणि राज्यसभेच्या एका सदस्याचा समावेश होता.

MPs Suspended | नेमकं काय घडलं?

लोकसभेत झालेल्या घुसखोरीच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक झाले होते. विरोधकांनी हा मुद्दा चांगलाच लावून धरला होता. काही खासदार तर वेलमध्ये येऊन गोंधळ घालत होते. या सर्व खासदारांना संसदेच्या विशेष अवधीवेशनासाठी निलंबित करण्यात आलं आहे.

कल्याण बॅनर्जी, ए राजा, दयानिधी मारन, अपरुप पोदार, प्रसून बॅनर्जी, ईटी मोहम्मद बशीर, जी सेल्वल्म, अन्नादुरई, टी सुमति, अधीर रंजन चौधरी, रवीस्वामी प्रेम चंद्रन, शताब्दी रॉय, सौगत रॉय, असीथ कुमार, कौशल कुमार, एंटो एंटोनी, पल्ली मणिकम, प्रतिभा मंडल, काकोली घोष, सुनील मंडल, के मुरलधरन आणि अमर सिंह आदी खासदारांचं निलंबन करण्यात आलं आहे. आता पर्यंत निलंबित खासदारांची संख्या 47 झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

Dawood Ibrahim | ‘या’ अभिनेत्रींच्या प्रेमात आकंठ बुडाला होता डॉन दाऊद इब्राहिम!

Dawood Ibrahim | दाऊद इब्राहिमबाबत उज्ज्वल निकम यांचं मोठं वक्तव्य!

IPL 2024 Auction | जे आधी कधीच झालं नाही ते होणार; आयपीएलच्या लिलावापूर्वी मोठी बातमी समोर

Dawood | अंडरवर्ल्ड डॉन दाऊदबाबत मोठी माहिती समोर!

Tripti Dimriचं अनुष्काच्या भावासोबत ब्रेकअप, ‘या’ बलाढ्य व्यक्तीसोबत सुरु झालंय अफेअर?