IPL 2024 Auction | आता IPL 2024 च्या लिलावासाठी अवघे काही तास उरले आहेत. 19 डिसेंबर रोजी दुबईतील कोका-कोला परिसरात 333 खेळाडूंवर बोली लावली जाणार आहे. यावेळी आयपीएलने लिलावासाठी 333 खेळाडूंची निवड केली आहे. यापैकी 214 भारतीय आणि 119 विदेशी खेळाडू आहेत. यावेळी लिलावात चाहत्यांना असं काही पाहायला मिळालंय जे गेल्या 16 सीझनमध्ये एकदाही झालं नाही.
IPL 2024 Auction पूर्वी मोठा निर्णय
आतापर्यंत परदेशी लिलावदार आयपीएलमधील खेळाडूंसाठी बोली लावत होते, परंतु यावेळी एक भारतीय असं करणार आहे. BCCI ने देखील या लिलावकर्त्याच्या नावाची पुष्टी केली आहे. विशेष म्हणजे यावेळी लिलाव करणारी महिला आहे. आयपीएलच्या इतिहासात ही पहिलीच वेळ असेल जेव्हा एखादी महिला लिलावकर्ता खेळाडूंचा लिलाव करेल.
यावेळी मल्लिका सागर (IPL 2024 Auction) लिलावात बोली लावणार असल्याची बातमी समोर आली आहे. मल्लिका सागर ही मुंबईत स्थायिक असून तिने यापूर्वीही हे काम केलं आहे.
मल्लिकाने महिला प्रीमियर लीग 2023 मधील सर्व खेळाडूंचा सलग 2 वेळा यशस्वीपणे लिलाव केला आहे. Cricbuzz ने दिलेल्या वृत्तानुसार, BCCI ने फ्रँचायझींना कळवलं आहे की मल्लिका सागर, एक स्वतंत्र व्यावसायिक लिलावकर्ता, लिलाव आयोजित करेल आणि लिलावाच्या सर्व पैलूंसाठी ती एकमेव मध्यस्थ असेल.
आयपीएल 2008 मध्ये सुरू झाले आणि आतापर्यंत एकूण 16 हंगाम खेळले गेले आहेत. या लीगमध्ये आतापर्यंत फक्त 2 लिलावकर्त्यांना लिलाव करण्याची संधी मिळाली आहे.
पहिला रिचर्ड मेडेली आणि दुसरा फिलिप एडमीड्स. आयपीएलच्या पहिल्या 10 वर्षांत रिचर्ड मॅडले लिलावाचं आयोजन करायचे. यानंतर फिलिप अॅडम्सने ही भूमिका साकारली. त्याच वेळी, आयपीएल 2022 च्या मेगा लिलावादरम्यान, अॅडम्सची तब्येत बिघडली, त्यानंतर चारू शर्माने त्या दिवशी लिलाव केला.
महत्त्वाच्या बातम्या-
Dawood | अंडरवर्ल्ड डॉन दाऊदबाबत मोठी माहिती समोर!
Tripti Dimriचं अनुष्काच्या भावासोबत ब्रेकअप, ‘या’ बलाढ्य व्यक्तीसोबत सुरु झालंय अफेअर?
Pune News | पुण्यातील सवाई गंधर्व महोत्सवात आग लागल्याने मोठी खळबळ
Aishwarya Rai | ती आता लहान राहिलेली नाही!, अमिताभ बच्चन यांची ‘ती’ पोस्ट कुणासाठी???
Entertainment News: मुलगा झाला की मुलगी???, मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्रीने दिली गोड बातमी