Aishwarya Rai | ती आता लहान राहिलेली नाही!, अमिताभ बच्चन यांची ‘ती’ पोस्ट कुणासाठी???

Aishwarya Rai | सध्या बाॅलिवूडमध्ये अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या नात्याबद्दल तुफान चर्चा रंगली आहे. गेले काही दिवस त्यांच्या घटस्फोटाबाबत अनेक तर्कविर्तक लावले जात होते. सोशल मीडियावर बिग बी म्हणजेच अमिताभ बच्चन यांनी ऐश्वर्याला अनफाॅलो केल्याच्या सुद्धा जोरदार चर्चा रंगल्या होत्या.

दरम्यान, ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai) आणि अभिषेक बच्चन या दोघांच्या नात्यामध्ये सगळं काही ठीक असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. आराध्याच्या कार्यक्रमासाठी संपूर्ण बच्चन कुटुंब धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये जाताना कॅमेऱ्यामध्ये कैद झालं होतं. मात्र, एक नवी चर्चा सुरु झाली आहे ती म्हणजे बिग बी अमिताभ बच्चन यांनी केलेल्या एका पोस्टची… 

बिग बींनी काय पोस्ट केली?

काही दिवसांपूर्वी ऐश्वर्याने (Aishwarya Rai) घर सोडल्याच्या चर्चा सुरु होत्या. तर दुसरीकडे बिग बींनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या लेकीचा उल्लेख केल्याचे बघायला मिळतं आहे. आराध्या बच्चन हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय.

पोस्टमध्ये काय लिहिलं?

बिग बी अमिताभ बच्चन यांनी केलेल्या पोस्टमध्ये, आराध्याचा सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओबद्ल लिहिलं आहे. या व्हिडीओमध्ये आराध्या बच्चन ही स्टेजवर परफाॅर्मन्स करताना दिसत आहे.

विशेष म्हणजे आराध्याच्या शाळेतील कार्यक्रमात अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय आणि अगस्त्य नंदा हे पोहोचले होते. अमिताभ बच्चन यांनी ब्लाॅगमध्ये लिहिले की, “मी लवकरच तुमच्यासोबत असेल…आराध्याच्या स्कूल कॉन्सर्टमध्ये मी व्यस्त आहे.”

“आराध्याने एकदम मस्त परफॉर्मेंस केला. माझ्यासाठी ही गोष्ट खरंच फार अभिमानाची आहे. परफॉर्मन्स करत असताना स्टेजवर आराध्या एकदम नॅचरल वाट होती. परंतु आता ती इतकी देखील छोटी नक्कीच राहिला नाहीये.”, असं देखील त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

News Title : Aishwarya rai daughters shared a post by big b

थोडक्यात बातम्या-

INDvsSA | भारताच्या मागे लागलेलं शुक्लकाष्ठ थांबेना! शमी-चहरनंतर आता ‘हा’ बडा खेळाडू मालिकेतून बाहेर

India vs South Africa | पार वाट लावून टाकली!, ‘या’ खेळाडूंनी दक्षिण आफ्रिकेची हालत केली खराब

Bollywood News | पतीनेच केला कतरिना कैफचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल!

INDvSA | सिंग इज किंग! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात अर्शदीपनं उडवून दिली खळबळ

INDvSA | दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताची नवी चाल, आता ‘हा’ खेळाडू करणार डावाची सुरुवात