INDvSA | सिंग इज किंग! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात अर्शदीपनं उडवून दिली खळबळ

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

INDvSA | भारतीय क्रिकेट संघ आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्याला सुरुवात झाली आहे. T20 मालिकेत दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद मिळाल्यानंतर आता सर्वांचं लक्ष एकदिवसीय मालिकेकडे लागलं आहे. भारतीय संघ आपल्या नवख्या खेळाडूंसह मैदानात उतरला असून सर्वांचं कामगिरीकडे भारतीय क्रिकेट चाहत्यांसह संघ व्यवस्थापनाचं लक्ष आहे.

दक्षिण आफ्रिकेने पहिल्याच सामन्यात (INDvSA) नाणेफेकीचा कौल जिंकला आहे. आफ्रिकेचा कर्णधार मार्करमने पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे, मात्र दुसऱ्याच षटकात भारताने मार्करमचा निर्णय चुकीचा आहे की काय?, असं वाटू शकेल अशी कामगिरी केली आहे. दक्षिण आफ्रिकेला डावाच्या सुरुवातीलाच मोठा धक्का बसला आहे.

कुणी मोडलं आफ्रिकेचं कंबरडं?-

दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकून फलंदाजी घेतली खरी, मात्र दुसऱ्याच षटकात भारताचा नवोदित गोलंदाज अर्शदीप सिंगने आफ्रिकेला जोराचा झटका दिला आहे. त्याने दोन सलग चेंडूंवर आफ्रिकेच्या दोन फलंदाजांना माघारी पाठवलं.

भारतासाठी ही एक चांगली सुरुवात असून दक्षिण आफ्रिकेला (INDvSA) मात्र आपला डाव सावरण्यासाठी कसरत करावी लागण्याची शक्यता आहे.

आता अर्शदीपनं घेतलेल्या या विकेट्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. खाली आपल्याला तो व्हिडीओ पाहता येऊ शकतो. शेवटची अपडेट हाती आली तेव्हा अर्शदीपने चार विकेट्स घेतल्या होत्या तर आवेश खानने दोन विकेट घेतल्या होत्या.

दुसऱ्या षटकात अर्शदीपनं केली कमाल-

दरम्यान, भारतीय संघाकडून आज साई सुदर्शनने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीला सुरुवात केली आहे. तो ऋतुराज गायकवाडसह सलामीला येणार आहे. नाणेफेकवेळी भारताचा कर्णधार के.एल.राहुलने ही महत्त्वाची माहिती दिली. या सामन्यात संजू सॅमसन सुद्धा खेळताना दिसणार आहे.

News Title: indvsa Arshdeep Singh has jolted South Africa

महत्त्वाच्या बातम्या-

INDvSA | दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताची नवी चाल, आता ‘हा’ खेळाडू करणार डावाची सुरुवात

Shreyas Talpade | “त्याच्या पत्नीने योग्य निर्णय घेतला!”, श्रेयस तळपदेच्या प्रकृतीबद्दल मोठी माहिती समोर

Madhuri Dixit | त्या एका सीनसाठी 1 कोटी रुपये, माधुरीने केला मोठा गौप्यस्फोट

Job Alert | रेल्वेमध्ये मोठी भरती, परिक्षा आणि मुलाखत नाही थेट होणार निवड

Suryakumar Yadavच्या बायकोच्या एका पोस्टमुळे क्रिकेट वर्तुळात मोठी खळबळ