Shreyas Talpade | “त्याच्या पत्नीने योग्य निर्णय घेतला!”, श्रेयस तळपदेच्या प्रकृतीबद्दल मोठी माहिती समोर

Shreyas Talpade | मराठी आणि हिंदी चित्रपटात आपल्या अभिनयाची छाप पडणारा अभिनेता श्रेयस तळपदेला दोन दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. चित्रपटाचं चित्रिकरण संपवून घरी आल्यानंतर त्याला उशीरा हृदयविकाराचा झटका आला. दरम्यान, आता त्याच्या प्रकृतीबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

श्रेयस तळपदेच्या प्रकृतीबद्दल मोठी माहिती-

श्रेयस ‘वेलकम टू जंगल’ या चित्रपटाचं चित्रिकरण संपल्यानंतर घरी आला. त्यानंतर त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या वेळी त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याच्यावर अँजियोप्लास्टी करण्यात आली.

दरम्यान, श्रेयसच्याा (shreyas talpade) प्रकृतीबद्दल एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. अनेक कलाकार श्रेयसला रुग्णालयात भेटायला जात आहेत. या वेळी श्रेयसचा मित्र आणि दिग्दर्शक सोहम शाह याने त्याच्या प्रकृतीबद्दल मोठी माहिती दिली आहे.

काय म्हणाला सोहम शाह?

सोहम शाह म्हणाला, ‘श्रेयसला रविवारी संध्याकाळी किंवा सोमवारी सकाळी रुग्णालयातून सोडतील असं डॉक्टरांनी सांगितलं आहे… सध्या श्रेयसची प्रकृती स्थिर आहे”, अशी माहिती त्याने दिली आहे.

“श्रेयसला जेव्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं, त्याच दिवशी मी त्याची भेट घेतली. आज देखील मी त्याच्यासोबतच होतो. श्रेयसला पुन्हा हसताना आणि बोलताना पाहून मला आनंद होत आहे. त्याच्या पत्नीचे मी आभार मानेल, तिने योग्यवेळी योग्य निर्णय घेतला’, असं देखील श्रेयसचा मित्र सोहम शहा म्हणाला.

श्रेयसच्या प्रकृतीमध्ये सुधारणा-

अँजिओप्लास्टी ही शस्त्रक्रिया केल्यानंतर आता अभिनेत्याची प्रकृती सुधारत आहे. श्रेयसच्या प्रकृतीची माहिती चाहत्यांपर्यंत पोहोचल्यानंतर चाहत्यांनी देखील चिंता व्यक्त केली होती, मात्र आता सर्व काही ठीक असल्याचं कळतंय.

News Title : actor shreyas talpade health update

थोडक्यात बातम्या –

Madhuri Dixit | त्या एका सीनसाठी 1 कोटी रुपये, माधुरीने केला मोठा गौप्यस्फोट

Job Alert | रेल्वेमध्ये मोठी भरती, परिक्षा आणि मुलाखत नाही थेट होणार निवड

Suryakumar Yadavच्या बायकोच्या एका पोस्टमुळे क्रिकेट वर्तुळात मोठी खळबळ

‘या’ एका कारणामुळे Allu Arjun ने 10 कोटींची ऑफर धुडकावली!

CID फेम अभिनेत्रीचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाल्याने बॉलिवूडमध्ये खळबळ