India vs South Africa | पार वाट लावून टाकली!, ‘या’ खेळाडूंनी दक्षिण आफ्रिकेची हालत केली खराब

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

India vs South Africa | भारतीय क्रिकेट संघ आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला मात्र हा निर्णय त्यांच्या चांगलचा अंगलट आला. T20 मालिकेत दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद मिळाल्यानंतर आता सर्वांचं लक्ष एकदिवसीय मालिकेकडे लागलं होतं, मात्र या मालिकेच्या पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेची भारतीय गोलंदाजांनी दैना उडवली आहे.

भारतीय संघ आपल्या नवख्या खेळाडूंसह आज मैदानात उतरला आहे. त्यांच्या कामगिरीकडे संघ व्यवस्थापनाचं लक्ष आहे, त्यामुळे चांगली कामगिरी करण्याचा सर्वच भारतीय खेळाडूंचा प्रयत्न होता. त्यात सध्या तरी सर्वाधिक भाव खाऊन गेलाय भारताचा नवोदित गोलंदाज अर्शदीप सिंग… अर्शदीपनं या सामन्यात कमाल गोलंदाजी केली आहे.

दक्षिण आफ्रिकेनं किती धावा केल्या?

दुसऱ्याच षटकात अर्शदीपनं दक्षिण आफ्रिकेच्या (India vs South Africa) डावाला सुरुंग लावला. सलग दोन चेंडूंवर दोन खेळाडूंना बाद करुन त्याने भारताला चांगली सुरुवात करुन दिली. या धक्क्यातून आफ्रिकेचा संघ शेवटपर्यंत सावरला नाही, पुन्हा एकदा अर्शदीपनं आणखी दोघांना माघारी पाठवून दक्षिण आफ्रिकेला अडचणीत टाकलं तर दुसरीकडे आवेश खाननं देखील दोन विकेट काढत आफ्रिकेचा डाव 10 षटकांमध्येच 6 बाद 50 धावांच्या आसपास ढेपळावला होता.

दक्षिण आफ्रिकेच्या नंतरच्या फलंदाजांना देखील काही खास कामगिरी करता आली नव्हती. दक्षिण आफ्रिकेने 27.3 षटकांमध्ये सर्वबाद बाद 116 धावा केल्या होत्या. अर्शदीप सिंगने 5 तर आवेश खाननं 4 विकेट घेतल्या. आता दक्षिण आफ्रिकेच्या डावानंतर भारतीय संघ किती षटकांमध्ये हा सामना जिंकतो? याची क्रिकेटच्या चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.

तीन खेळाडू जुने बाकी सगळे नवखे!

दरम्यान, याआधी झालेल्या T20 (India vs South Africa) मालिकेत दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद मिळालं आहे. त्यामुळे आता एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. भारताकडून फक्त तीनच एकदिवसीय विश्वचषक खेळलेले खेळाडू खेळत आहेत. बाकी सगळा नवख्या खेळाडूंचा भरणा आहे. के.एल. राहुल भारतीय संघाचं नेतृत्त्व करतोय.

भारतीय संघाकडून आज (INDvsSA) साई सुदर्शनने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीला सुरुवात केली आहे. तो ऋतुराज गायकवाडसह सलामीला येणार आहे. नाणेफेकवेळी भारताचा कर्णधार के.एल.राहुलने ही महत्त्वाची माहिती दिली. या सामन्यात संजू सॅमसन सुद्धा खेळताना दिसणार आहे.

News Title: india vs south africa live score latest update

महत्त्वाच्या बातम्या-

Bollywood News | पतीनेच केला कतरिना कैफचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल!

INDvSA | सिंग इज किंग! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात अर्शदीपनं उडवून दिली खळबळ

INDvSA | दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताची नवी चाल, आता ‘हा’ खेळाडू करणार डावाची सुरुवात

Shreyas Talpade | “त्याच्या पत्नीने योग्य निर्णय घेतला!”, श्रेयस तळपदेच्या प्रकृतीबद्दल मोठी माहिती समोर

Madhuri Dixit | त्या एका सीनसाठी 1 कोटी रुपये, माधुरीने केला मोठा गौप्यस्फोट