INDvsSA | भारताच्या मागे लागलेलं शुक्लकाष्ठ थांबेना! शमी-चहरनंतर आता ‘हा’ बडा खेळाडू मालिकेतून बाहेर

INDvsSA | दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असलेल्या भारतीय क्रिकेट संघाच्या (Team India) शुक्लकाष्ठ काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. T20, एकदिवसीय आणि कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. यातील टी-20 मालिका संपली असून सध्या एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरु आहे. मात्र भारतीय संघाचे खेळाडू एकामागून एक या दौऱ्यातून माघार घेताना दिसत आहेत.

आता कुणी घेतली माघार?

भारताचा नवोदित फलंदाज आणि यष्टीरक्षक इशान किशनने (Ishan Kishan) दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून माघार घेतली आहे. बीसीसीआयने आपल्या सोशल मीडिया खात्यांवरुन याबाबत घोषणा केली आहे. इशान किशनने का दौऱ्यातून माघार घेतली याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही, मात्र खासगी कारणास्तव त्याने दौऱ्यातून आपलं नाव वगळण्याची विनंती बीसीसीआयला केली होती आणि त्यांनी ती मान्य केली.

इशान किशनने माघार घेतल्यानंतर आता त्याच्या जागी केएस भरत(KS Bharat)ची निवड करण्यात आली आहे. इशान फलंदाजीसोबतच कसोटी यष्टीरक्षणही करणार होता, मात्र आता ही जबाबदारी केएल राहुलच्या खांद्यावर पडण्याची शक्यता आहे.

केएलने (KL Rahul) नुकत्याच झालेल्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषकात चांगली कामगिरी केली आहे, त्यासोबत भरतला संघात स्थान मिळालं तर तो सुद्धा यष्टीरक्षण करताना दिसू शकतो.

इशानने नुकतंच केलं होतं पदार्पण-

इशान किशनने या वर्षीच्या जुलै महिन्यातच आपलं कसोटी सामन्यांमधील पदार्पण केलं होतं. वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन सामन्यांमध्ये तो खेळताना दिसला होता. यामध्ये तीन डावांमध्ये त्याने एका अर्धशतकासह 78 धावा केल्या होत्या, तसेच 5 झेल सुद्धा घेतले होते. केएल राहुलने विश्वचषकात दमदार प्रदर्शन केल्यामुळे इशान किशनच्या स्थानावर याआधीच प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं.

आतापर्यंत तीन खेळाडूंची माघार-

भारतीय संघाचे एकामागून एक खेळाडू दक्षिण आफ्रिकेचा दौरा सोडताना दिसत आहेत. सर्वात आधी घोट्याच्या दुखापतीमुळे वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला (Mohammed Shami) कसोटी संघातून बाहेर व्हावं लागलं. त्यानंतर दीपक चहरलाही (Deepak Chahar) वैद्यकीय कारणास्तव एकदिवसीय सामन्यांमधून माघार घ्यावी लागली. आता त्यामध्ये इशान किशनची भर पडली असून त्यानंही काही कारण न सांगता कसोटी मालिकेतून माघार घेतली आहे.

News Title: indvssa ishan kishan out from test-series

महत्त्वाच्या बातम्या-

India vs South Africa | पार वाट लावून टाकली!, ‘या’ खेळाडूंनी दक्षिण आफ्रिकेची हालत केली खराब

Bollywood News | पतीनेच केला कतरिना कैफचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल!

INDvSA | सिंग इज किंग! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात अर्शदीपनं उडवून दिली खळबळ

INDvSA | दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताची नवी चाल, आता ‘हा’ खेळाडू करणार डावाची सुरुवात

Shreyas Talpade | “त्याच्या पत्नीने योग्य निर्णय घेतला!”, श्रेयस तळपदेच्या प्रकृतीबद्दल मोठी माहिती समोर