Maratha Reservation | मराठा आरक्षणाबाबत एकनाथ शिंदेंनी दिली मोठी अपडेट!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) रविवारी मनोज जरांगे पाटील यांच्या जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी गावात सभा झाली. या बैठकीनंतर ते आपली रणनीती जाहीर करणार होते. मात्र मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) सरकारने दिलेली 24 डिसेंबरची डेडलाइन निश्चित करण्यात आली आहे. ही तारीख जवळ आली आहे. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)  यांनी मोठी घोषणा केली आहे.

Maratha Reservation | एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती

मराठा आरक्षणसंदर्भातला (Maratha Reservation) अहवाल शिंदे समितीकडून सरकारला सादर करण्यात आला आहे. न्यायमूर्ती शिंदे समितीच्या कामकाजाचा शेवटचा अहवाल आहे. मुख्यमंत्री शिंदे अहवाल सभागृहात मांडणार आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे. यावेळीदेवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित होते.

Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा इशारा

यापूर्वी रविवारी जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणावर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारला 24 डिसेंबरनंतरची वेळ देण्यास नकार दिला होता.

24 डिसेंबर 2023 नंतर आम्ही एक तासही देणार नाही, तोपर्यंत मराठ्यांना आरक्षण दिले जाणार नाही. पुढील आंदोलनात 3 कोटींहून अधिक लोक असतील, असं त्यांनी सांगितलं.

शनिवारी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे यांनी जरांगे यांची भेट घेतली होती. यावेळी जरंगे यांना सरकारने आतापर्यंत काय केले हे सांगितलं आणि मुदत वाढवून देण्याची मागणीही केली.

Eknath Shinde gave a big update about Maratha reservation

महत्त्वाच्या बातम्या- 

MPs Suspended | मोठी बातमी! लोकसभा अध्यक्षांचा विरोधकांना झटका

Sanjay Raut पुन्हा जेलमध्ये जाणार?; ‘या’ बड्या नेत्याच्या वक्तव्याने खळबळ

Dawood Ibrahim | ‘या’ अभिनेत्रींच्या प्रेमात आकंठ बुडाला होता डॉन दाऊद इब्राहिम!

Dawood Ibrahim | दाऊद इब्राहिमबाबत उज्ज्वल निकम यांचं मोठं वक्तव्य!

IPL 2024 Auction | जे आधी कधीच झालं नाही ते होणार; आयपीएलच्या लिलावापूर्वी मोठी बातमी समोर