Sanjay Raut | आमदार नितेश राणे यांनी दोन दिवसांपूर्वी विधानसभेत आरोप केले. या आरोपानंतर खळबळ माजली. ठाकरे गटाचा महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर हे सलीम कुत्तासोबत पार्टीत सहभागी झाल्याचा दावा नितेश राणे यांनी केला होता.
नितेश राणे यांच्या आरोपानुसार ठाकरे गटाचा नाशिक महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर हे सलीम कुत्तासोबत पार्टीत सहभागी झाले. परंतु आता काँग्रेस आमदाराने नवीनच दावा केला आहे. त्यानुसार सलीम कुत्ता याची 1998 मध्ये हत्या झाली. हॉस्पिटलमध्ये त्याचा मर्डर झाला, असा दावा काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याला यांनी केला आहे.
Sanjay Raut यांच्यावर गंभीर आरोप
कैलास गोरंट्याला यांनी केलेल्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजलीये. आता या प्रकरणी खासदार संजय राऊत यांच्यावरही गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
“Sanjay Raut लवकरच तुरुंगात असतील”
सलीम कुत्ता प्रकरणाचे धागेदोरे हे संजय राऊत यांच्यापर्यंत आहेत. त्यामुळे संजय राऊत यांची चौकशी होईल आणि संजय राऊत लवकरच तुरुंगात असतील. डिसेंबरच्या शेवटी किंवा जानेवारी महिन्यामध्ये राऊत तुरुंगात दिसतील, असं आमदार संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.
हे वारंवार असं भासवण्याचा प्रयत्न करत होतो आहे की उद्धव ठाकरे यांच्याशी सलीम कुत्ताचे तार आहेत. पण मी डंके की चोटपर सांगतो की, उद्धव ठाकरे यांचे कोणतेही संबंध सलीम कुत्ताशी नाहीयेत. हे संबंध केवळ आणि केवळ संजय राऊत यांचेच आहेत. संजय राऊतांची बडबड लवकर बंद होणार आहे, असं म्हणत शिरसाट यांनी संजय राऊतांवर घणाघात केला आहे.
सलीम शेख उर्फ सलीम कुत्ता 2016 पासून पुण्यातील येरवडा कारागृहात बंद आहे. 1993 च्या बॉम्बस्फोटात सह आरोपी असलेला सलीम कुत्ता 2016 पासून येरवडा कारागृहात शिक्षा भोगत आहे. 2016 च्या आधी सलीम नाशिकच्या कारागृहात शिक्षा भोगत होता. नाशिक कारागृहात शिक्षा भोगत असतानाच कुत्ता पॅरोलवर सुटला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
Dawood Ibrahim | ‘या’ अभिनेत्रींच्या प्रेमात आकंठ बुडाला होता डॉन दाऊद इब्राहिम!
Dawood Ibrahim | दाऊद इब्राहिमबाबत उज्ज्वल निकम यांचं मोठं वक्तव्य!
IPL 2024 Auction | जे आधी कधीच झालं नाही ते होणार; आयपीएलच्या लिलावापूर्वी मोठी बातमी समोर
Dawood | अंडरवर्ल्ड डॉन दाऊदबाबत मोठी माहिती समोर!
Tripti Dimriचं अनुष्काच्या भावासोबत ब्रेकअप, ‘या’ बलाढ्य व्यक्तीसोबत सुरु झालंय अफेअर?