Dawood Ibrahim | ‘या’ अभिनेत्रींच्या प्रेमात आकंठ बुडाला होता डॉन दाऊद इब्राहिम!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Dawood Ibrahim | अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला विषबाधा झाल्याची बातमी आहे. पाकिस्तानी पत्रकारांनी हा मोठा दावा केला आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर (Dawood Ibrahim) कराचीतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याला विष देऊन ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं मीडिया रिपोर्ट्समध्ये बोललं जात आहे. मात्र या वृत्ताला अद्याप कोणीही दुजोरा दिलेला नाही.

दाऊद इब्राहिमच्या (Dawood Ibrahim) गुन्ह्यांची कहाणी इतकी लांबलचक आहे की त्याबद्दल बोललो तर शब्द कमी पडू शकतात अंडरवर्ल्ड डॉन आणि भारताचा मोस्ट वॉन्टेड शत्रू दाऊद इब्राहिमचा बॉलिवूडशी दीर्घकाळ संबंध आहे.

अनेक धमक्या आणि कटात दाऊदचं नाव अनेकवेळा समोर आलं आहे. याशिवाय दाऊदही अनेकदा बॉलिवूड अभिनेत्रींच्या प्रेमात पडला आहे. एकदा दाऊदला राज कपूरची एक अभिनेत्री आवडली होती, पण त्यामुळे तीचं करिअर उद्ध्वस्त झालं.

दाऊदही पडला होता प्रेमात

जगात दहशत पसरवणारा दाऊदही प्रेमात पडला. दाऊदचं हृदय अनेक मुलींसाठी धडधडत असलं, तरी बॉलीवूडची अभिनेत्री मंदाकिनी हिच्यावरील प्रेमाच्या चर्चा बराच काळ सुरू होत्या. जेव्हा राज कपूरचा चित्रपट राम तेरी गंगा मैली पडद्यावर प्रदर्शित झाला तेव्हा प्रत्येकजण चित्रपटातील नायिकेच्या सौंदर्याची दखल घेत राहिला. मंदिकिनीने या चित्रपटात अनेक बोल्ड सीन्स दिले आहेत. बॉलिवूडपासून दुबईपर्यंत मंदाकिनीची चर्चा होती.

दाऊदवरही मंदाकिनीची जादू चालली होती. नव्वदच्या दशकात दाऊद दुबईत राहू लागला तेव्हा मंदाकिनी अनेकदा दाऊदला भेटण्यासाठी दुबईला जात असे. तेव्हाच त्यांची मैत्री आणि प्रेम फुललं. अनेकदा दोघे एकत्र वेळ घालवताना दिसले. दोघे अनेकदा क्रिकेटच्या मैदानावर एकत्र बसल्याचे फोटो समोर आले होते. यानंतर संपूर्ण जगाने डॉनच्या प्रेमकथेवर विश्वास ठेवला.

दाऊद आणि मंदाकिनी यांचं हसणं, बोलणं हे फोटो सर्व काही सांगत होते. मात्र त्यांचं प्रेम फार काळ टिकलं नाही आणि नंतर मंदाकिनी डॉनपासून विभक्त झाली.

नव्वदच्या दशकात देव आनंद यांनी बॉलिवूडमध्ये नवा चेहरा आणला. देवानंदने आपल्या ‘प्यार के तराणे’ या चित्रपटात अनिता अयुबला हिरोईन बनवलं. अनिता अयुब पाकिस्तानची असली तरी तिने भारतातील लोकांच्याही हृदयात स्थान निर्माण केलं होतं.

अनिता अयुब तिच्या सौंदर्यासाठी नक्कीच प्रसिद्ध झाली होती. दाऊदने अनिता अयुबसाठी मुंबईतील एका चित्रपट निर्मात्याची हत्याही केल्याचं बोललं जातं. दाऊदच्या प्रेमाची कहाणी काही दिवस लोकांच्या ओठावर राहिली आणि नंतर शांत झाली. अनिता अयुबने पाकिस्तानातील अनेक मालिका आणि चित्रपटांमध्येही काम केलं आहे.

Dawood was deeply in love with these actresses!

महत्त्वाच्या बातम्या- 

Dawood Ibrahim | दाऊद इब्राहिमबाबत उज्ज्वल निकम यांचं मोठं वक्तव्य!

IPL 2024 Auction | जे आधी कधीच झालं नाही ते होणार; आयपीएलच्या लिलावापूर्वी मोठी बातमी समोर

Dawood | अंडरवर्ल्ड डॉन दाऊदबाबत मोठी माहिती समोर!

Tripti Dimriचं अनुष्काच्या भावासोबत ब्रेकअप, ‘या’ बलाढ्य व्यक्तीसोबत सुरु झालंय अफेअर?

Pune News | पुण्यातील सवाई गंधर्व महोत्सवात आग लागल्याने मोठी खळबळ