Dawood Ibrahim | पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड?; दाऊदबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती समोर

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | अंडरवर्ल्ड डॉन माफिया दाऊद इब्राहिमचा (Dawood Ibrahim) पाकिस्तानमध्ये मृत्यू झाल्याच्या चर्चा आहे. शुक्रवारी रात्री कराचीतील रुग्णालयात दाखल दाऊद इब्राहिमला विषबाधा झाल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर दाऊद इब्राहिमचा (Dawood Ibrahim) जवळचा नातेवाईक आणि माजी क्रिकेटपटू जावेद मियांदादसह संपूर्ण कुटुंबाला नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं. मात्र दाऊदच्या मृत्यूला अधिकृत दुजोरा अद्याप मिळालेला नाही.

Dawood Ibrahim | पाकिस्तानात नेमकं चाललंय काय?

संरक्षण तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, पाकिस्तान या प्रकरणातील सत्य कधीच सांगणार नाही आणि सत्य बाहेर येऊ देणार नाही, उलट अशी काही घटना घडल्यास कट रचून लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करेल आणि आपल्या एका बड्या दहशतवाद्याला ठार करेल.

भारताचा मोस्ट वाँटेड दहशतवादी दाऊद इब्राहिम याची कराचीमध्ये विष देऊन हत्या करण्यात आल्याची चर्चा पाकिस्तानच्या माध्यमांमध्ये सुरू आहे. अंडरवर्ल्ड माफिया डॉन दाऊद इब्राहिमवर (Dawood Ibrahim) किडनीच्या गंभीर आजारावर काही काळ कराचीच्या आगा खान रुग्णालयात उपचार सुरू होते, असंही सांगण्यात येत आहे. दरम्यान शुक्रवारी सायंकाळी हॉस्पिटलच्या युनिटमध्ये दाखल असताना त्यांना विषबाधा झाली.

दाऊद इब्राहिमच्या (Dawood Ibrahim) मृत्यूची बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानमधील विविध पत्रकारांपर्यंत पोहोचली. मात्र यानंतर पाकिस्तानमध्ये रविवारी अचानक विमानतळांवरची लाइट गेल्याचं आणि इंटरनेट ठप्प झाल्याचं समोर आलं आहे. यामुळे पाकिस्तान नेमकं काय लपवण्याचा प्रयत्न करतोय, असा सवाल केला जातोय.

पाकिस्तानमध्ये असं काही घडलं आहे की त्यामुळे इंटरनेट सुविधा अचानक बंद करण्यात आली आहे. पाकिस्तानातील ठप्प इंटरनेट व्यवस्थेवर पाकिस्तानी पत्रकारांनीही सोशल मीडियावर खुलेआम वक्तव्य केलं आहे.

पाकिस्तानमधील लाहोरमधील एका वरिष्ठ पत्रकाराने अमर उजाला डॉट कॉमला सांगितलं की, पाकिस्तान दूरसंचार प्राधिकरणाने कोणतंही कारण नसताना इंटरनेट सेवा बंद केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

Maratha Reservation | मराठा आरक्षणाबाबत एकनाथ शिंदेंनी दिली मोठी अपडेट!

MPs Suspended | मोठी बातमी! लोकसभा अध्यक्षांचा विरोधकांना झटका

Sanjay Raut पुन्हा जेलमध्ये जाणार?; ‘या’ बड्या नेत्याच्या वक्तव्याने खळबळ

Dawood Ibrahim | ‘या’ अभिनेत्रींच्या प्रेमात आकंठ बुडाला होता डॉन दाऊद इब्राहिम!

Dawood Ibrahim | दाऊद इब्राहिमबाबत उज्ज्वल निकम यांचं मोठं वक्तव्य!