Eknath Shinde | शेतकऱ्यांसाठी एकनाथ शिंदेंनी विधानसभेत केली मोठी घोषणा!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक घोषणा केल्या आहेत. त्यामधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी अनेक घोषणा केल्या आहेत. राज्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी टास्क फोर्सचं पुनर्गठन करण्याचा, धान उत्पादक शेतकऱ्यांना यावर्षी प्रति हेक्टरी 20 हजार रुपये बोनस देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज विधानसभेत केली.

शेतकऱ्यांसाठी शिंदेंनी केली मोठी घोषणा

अवकाळी पाऊस, गारपीट आणि एकंदरच बळीराजाच्या समस्यांसंदर्भात विधानसभेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी अल्पकालिन चर्चा उपस्थित केली होती. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी ते म्हणाले, कृषि विभागाच्या प्रमुख योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जुलै 2022 पासून तब्बल 15 हजार 40 कोटींचा लाभ देण्यात आला आहे.

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील अनुदान देण्यास सुरुवात केली असून आतापर्यंत 14 लाख 31 हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सुमारे 5 हजार 190 कोटी रुपये जमा करण्यात आल्याचं एकनाथ शिंदेंनी सांगितलं.

राज्यात यंदा सरासरीच्या 90 टक्के असमान पाऊस झाल्यामुळे पाण्याचं संकट निर्माण झाले आहे. केंद्राच्या पथकाने नुकतेच दुष्काळग्रस्त जाहीर केलेल्या तालुक्यांना भेटी देऊन पाहाणी केली आहे. 40 तालुक्यांमधील शेतकऱ्यांना 2 हजार 587 कोटी इतक्या रकमेची मदत देण्याबाबत केंद्र सरकारला मागणी पत्र पाठवलं आहे, अशी माहिती शिंदेंनी दिलीये.

केंद्राच्या इंटरमिनिस्ट्रीअल को-आर्डिनेशन टीमने 15 पैकी नऊ जिल्ह्यांना भेटी दिल्या. शासनाच्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची त्यांच्यासोबत बैठकही झाली. ही मदत लवकर प्राप्त करून घेण्याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे बैठक होणार आहे त्यामुळे केंद्राकडून लवकरात लवकर निधी मिळेल, असा विश्वास असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

शेतकरी बांधवांनाही माझी विनंती आहे की, धीर सोडू नका.. खचून जाऊ नका.. शासन सदैव तुमच्या पाठीशीच नव्हे, तर तुमच्या सोबत आहे.. आत्महत्या करून आपल्या पोराबाळांना, आपल्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडू नका, ही माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, असं शिंदेंनी म्हटलंय.

विविध मार्गांनी शेतकऱ्यांना खंबीरपणं उभं करण्याचा आमचा सातत्यानं प्रयत्न सुरू आहे. माझी विरोधी पक्षांना कळकळीची विनंती आहे की, या प्रयत्नात साथ द्या. कृपया शेतकऱ्यांच्या प्रश्नांमध्ये राजकारण आणू नका. आपण चर्चा करू, संवाद साधू – समन्वय राखू. यातून आपल्या राज्याचा कृषी विकास दर कसा वाढेल, असे प्रयत्न करू. यातच आपल्या बळीराजाचं आणि आपल्या राज्याचं हित आहे, असंही त्यांनी म्हटलंय.

महत्त्वाच्या बातम्या- 

Dawood Ibrahim | पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड?; दाऊदबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती समोर

Maratha Reservation | मराठा आरक्षणाबाबत एकनाथ शिंदेंनी दिली मोठी अपडेट!

MPs Suspended | मोठी बातमी! लोकसभा अध्यक्षांचा विरोधकांना झटका

Sanjay Raut पुन्हा जेलमध्ये जाणार?; ‘या’ बड्या नेत्याच्या वक्तव्याने खळबळ

Dawood Ibrahim | ‘या’ अभिनेत्रींच्या प्रेमात आकंठ बुडाला होता डॉन दाऊद इब्राहिम!