Bigg Boss 17 | सुशांतबद्दल बोलू नकोस, कारण तुझ्या सासरचे… अंकिताला आईचा मोठा सल्ला

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Bigg Boss 17 | ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून अभिनेत्री अंकिता लोखंडेला (Ankita Lokhande) प्रसिद्धी मिळाली. याच मालिकेत तिचा को-स्टार सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) यालाही प्रसिद्धी मिळाली. त्यामुळे दोघांच्याही फिल्मी करिअरची सुरुवात ही याच मालिकेपासून झाली. दोघेही कलाकार बरीच वर्ष एकत्र होते. मात्र नंतर त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. सुशांतने आत्महत्या केल्यानंतर अंकिताने विकी जैनसोबत आपला संसार थाटला.

आता अंकिता आणि विकी हे जोडपे बिग बॉसमध्ये (Bigg Boss 17) सहभागी झाले आहेत. बिग बॉसमध्ये येताच दोघांत अगदी पहिल्या दिवसापासून वाद झाले. त्यांची भांडणं अनेकदा टोकाची होती. त्यात अंकिता सतत सुशांतचा उल्लेखही करत असते. मात्र सुशांतचा उल्लेख विकीच्या कुटुंबाला टोचत असल्याने त्यांच्या नात्यात अडचणी येऊ शकतात. याच कारणामुळे अंकिताला तिची आई वंदना लोखंडे यांनी सल्ला दिला आहे.

वंदना लोखंडे यांचा लेकीला सल्ला

‘बिग बॉस 17’ (Bigg Boss 17)मध्ये अंकिताच्या आईची एंट्री झाली आहे. त्यांनी बिग बॉसमध्ये येताच लेकीला महत्वाचा सल्ला दिला आहे. याचीच सध्या चर्चा होत आहे. बिग बॉसच्या फॅमिली स्पेशल वीकमध्ये वंदना लोखंडे यांनी सहभाग घेतला आहे. याचदरम्यान त्यांनी अंकिताला सुशांतबद्दल मोठा सल्ला दिला आहे.

अंकिताने पती विकीसोबत आदराने वागायला हवं. टीव्हीवर असं सर्वांसमोर भांडणं हे त्यांच्या नात्याबद्दल चुकीचा संदेश देत आहे. याचा दोन्ही कुटुंबावर परिणाम होत आहे. त्यातच सतत सुशांतचा उल्लेख करणं विकीच्या कुटुंबाला आवडत नाही. त्यामुळे अंकिताने सुशांतबद्दल बोलणं बंद करावं, असा सल्ला वंदना लोखंडे यांनी आपल्या लेकीला दिला आहे.

Bigg Boss 17 | “यापुढे मी सुशांतचा उल्लेख करणार नाही..”

आई वंदना लोखंडे यांचा सल्ला अंकितानेही स्वीकार केला. आईचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर अंकिताने सर्व प्रकरणाचा खुलासा केला. मी सुशांत बद्दल कधीच बोलली नाही. मुनव्वर आणि अभिषेक मला सतत त्याच्याबद्दल विचारत असतात. मी फक्त त्यांना सांगत असते, असं अंकिता म्हणाली.

तसेच पुढे अंकिता म्हणाली की, ‘यापुढे मी सुशांतचा उल्लेख करणार नाही. तसेच असे काहीही बोलणार नाही ज्याचा माझ्या कुटुंबाला त्रास होईल.’, अंकिता आणि विकी यांच्यातील भांडणे इतकी टोकापर्यंत गेलती की, दोघांनीही आपण लग्न करून चूक केल्याचं म्हटलं होतं. त्यातच विकीच्या आईने अंकितावर खूप आरोप केले होते. यानंतर सोशल मीडियावर  त्यांच्यावर प्रचंड टीका करण्यात आली.

अंकिताची बाजू घेत अभिनेत्री कंगना रनौतनेही आपली प्रतिक्रिया दिली होती. त्यामुळे बिग बॉस इतर स्पर्धकांपेक्षा अंकिता आणि विकीमुळेच अधिक चर्चेत आहे. शो (Bigg Boss 17) बद्दल बोलायचं म्हटलं तर बिग बॉसचा हा सतरावा सीजन आता अंतिम फिनालेकडे वाटचाल करत आहे. येत्या 28 जानेवारीला याच्या विजेत्याची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या- 

‘Kangana Ranaut ला हृतिकसारखा दिसणारा मुलगा सापडला’; ड्रामा क्वीन पडली प्रेमात?

Aamir Khan | आमिरच्या लेकीचं ‘ग्रँड वेडिंग रिसेप्शन’; ‘इतके’ पाहुणे राहणार उपस्थित

कहर! Whatsapp मेसेज सीन करुनही रिप्लाय दिला नाही, पत्नीने पतीसोबत केलं ‘हे’ कृत्य!

Pune News | दादा-भाईंचं आता काही खरं नाही!, पुण्यातील ‘या’ 21 गॅंगसाठी पोलिसांचा खास प्लॅन

Horoscope 2024 | ‘या’ राशींच्या व्यक्तींवर होईल लक्ष्मीची कृपा; वाचा राशीभविष्य