Aamir Khan | आमिरच्या लेकीचं ‘ग्रँड वेडिंग रिसेप्शन’; ‘इतके’ पाहुणे राहणार उपस्थित

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Aamir Khan | बॉलीवुड अभिनेता आमिर खानची (Aamir Khan) लाडकी लेक आयरा खान (Ira Khan) आणि नूपुर शिखरे (Nupur Shikhare) यांचा उदयपुरमध्ये मोठ्या उत्साहात विवाहसोहळा पार पडला. आयरा आणि नूपुर यांनी अगोदर नोंदणी पद्धतीने विवाह केला होता. नंतर त्यांनी ख्रिश्चन पद्धतीने दुसऱ्यांदा लग्न केलं. त्यांच्या लग्नातील फोटो आणि व्हिडीओ याची सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली.

याशाही विवाहानंतर आज (13 जानेवारी) आयरा आणि नूपुर यांची रिसेप्शन पार्टी होणार आहे. आमीरने (Aamir Khan) मुंबईतील जियो वर्ल्ड सेंटरमध्ये या रिसेप्शनचे आयोजन केले आहे. आजच्या पार्टीत अनेक दिग्गजांना निमंत्रण देण्यात आलं आहे. शाहरुख खान, सलमान खान, अजय देवगण, अमिताभ बच्चन, करण जोहर, अक्षय कुमार, करीना कपूर, राजकुमार हिरानी, ​​आशुतोष गोवारीकर यांसह अनेक कलाकारांची रिसेप्शनमध्ये उपस्थिती असणार आहे. विवाहानंतर आता आयरा आणि नूपुरच्या रिसेप्शनची चर्चा रंगत आहे.

रिसेप्शनला येणार 2500 पाहुणे

आमीरच्या (Aamir Khan ) लेकीच्या रिसेप्शन पार्टीसाठी तब्बल 2500 हून अधिक लोक येणार असल्याचे म्हटले जात आहे. पाहुण्यांसाठी मेन्यूमध्ये खास पदार्थ ठेवण्यात आले आहेत. रिसेप्शनमध्ये सुमारे 9 प्रकारच्या क्यूजीन्स असणार असल्याचे म्हटले जातेय. यात गुजरातपासून ते लखनवीपर्यंत तसेच महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थांचा समावेश असणार आहे.

रिसेप्शनसाठी मुंबईतील जियो वर्ल्ड सेंटरमध्ये महागडी सजावटही करण्यात आली आहे. यासोबतच रिसेप्शनमध्ये एक धमाल म्यूजिक पार्टीदेखील होणार आहे. यासाठी आमीरने जय्यत तयारी केली आहे. आज आमीरचे नातेवाईक तसेच मित्र-मंडळी त्याच्या लाडक्या लेकीला आणि जावयाला आशीर्वाद देतील.

Aamir Khan च्या मुलीच्या लग्नाची सोशल मीडियावर चर्चा

रिसेप्शन नंतर अमीर खान (Aamir Khan) सोबत त्याची मुलगी आयरा खान आणि नूपुर शिखरे माध्यमांशी देखील संवाद साधणार आहेत. आयरा आणि नूपुर यांच्या उदयपूरमध्ये 6 जानेवारी ते 10 जानेवारी असे पाच दिवस चाललेल्या भव्य लग्नाची बरीच चर्चा झाली. यापूर्वी त्यांनी 3 जानेवारीला मुंबईत नोंदणी विवाह केला होता.

पाच दिवस झालेल्या या विवाहाची सोशल मिडियावर प्रचंड चर्चा होती. लग्नातील आमीर खान (Aamir Khan) आणि त्याची दुसरी पत्नी किरण राव यांची केमिस्ट्री ते संगित सेरेमनीमधील सर्वांचे परफॉर्मन्स या सर्व गोष्टी चर्चेत राहिल्या. लग्नात आमीर भावुक झाल्याचेही दिसून आले. किरण रावने आयरासाठी गाणेही गायले. आमीरची पहिली पत्नी रिना दत्ता आणि किरण राव यांनी सोबत लेकीचे लग्न एन्जॉय केले. यावरही मिडियावर बऱ्याच प्रतिक्रिया उमटल्या. आता आमीरच्या लेकीचे रिसेप्शन कसे असणार, याची सर्व चाहत्यांना प्रतिक्षा लागली आहे.

महत्वाच्या बातम्या- 

Pune Loksabha | पुण्यातून उमेदवारी हवीय?, भाजपतील इच्छुंकाची ‘ही’ क्षमता ठरणार गेमचेंजर

Stock Market | 6 महिन्यात पैसे दुप्पट, ‘या’ शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल

Petrol Diesel Price | ‘या’ शहरांमध्ये पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त, जाणून घ्या आजचे दर

Ram Mandir | नवीन मंदिराचं उद्घाटन झाल्यावर सध्याच्या मंदिराचं काय करणार?, मोठी माहिती आली समोर

Health Update | उपचार करुन सुद्धा खोकला जाईना???, मोठी माहिती आली समोर