‘Kangana Ranaut ला हृतिकसारखा दिसणारा मुलगा सापडला’; ड्रामा क्वीन पडली प्रेमात?

Kangana Ranaut | अभिनेती कंगना रनौत (Kangana Ranaut ) ही तीच्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखली जाते. यासोबतच बऱ्याचदा ती चालू घडामोडींवरही प्रतिक्रिया देत असते. आता ती एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. कंगना नुकतंच एका मिस्ट्री बॉयसोबत दिसून आल्याने चर्चांना उधाण आलं आहे.

सोशल मिडियावर कंगनाच्या (Kangana Ranaut ) रिलेशनशिपच्या चर्चा रंगत आहेत. कंगना एका विदेशी मुलासोबत फिरताना दिसून आली. तिचे हे फोटो वाऱ्यासारखे व्हायरल होत आहेत. यानंतर सर्वजण कंगना या मिस्ट्री बॉयच्या प्रेमात असल्याचं म्हणत आहेत. मात्र कंगनाने याबाबत अद्याप कोणताही खुलासा केला नाहीये.

Kangana Ranaut च्या आयुष्यातील ‘तो’ मिस्ट्री बॉय कोण?

अभिनेत्री कंगना (Kangana Ranaut ) आणि एक विदेशी मुलगा सलूनमधून बाहेर पडताना दिसून आले. कंगनाने सुंदर स्काय ब्लू कलरचा स्कर्ट तसेच गाॅगल घातला होता. तिच्यासोबत असणाऱ्या मुलाचा तीने घट्ट हाथ पकडला होता. दोघेही यावेळी खूप आनंदी दिसत होते. दोघांनीही यावेळी कपल्स वाइब्स दिल्या. त्यामुळे चाहत्यांकडून आता वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत.

कंगना आणि या मिस्ट्री बॉयला पापाराझी यांनीही लगेच कॅमेऱ्यात टिपले. पापाराझी यांना पाहून कंगना लाजताना दिसली.  तिच्या लाजण्यामुळे तर त्यांच्या नात्याच्या चर्चा आणखीनच रंगल्यात. चाहते या मिस्ट्री बॉयबद्दल जाणून घेण्यासाठी आतुर आहेत.

“राणीला राजा मिळाला आहे”

कंगनाच्या (Kangana Ranaut ) फोटोवर चाहत्यांच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. चाहते यावेळी खूप खूश आहेत. या फोटोंवर कमेंट करत एका चाहत्याने ‘राणीला राजा मिळाला आहे.’, असं म्हटलं. तर एका युजरने म्हटलं, ‘कंगनाला शेवटी हृतिकसारखा दिसणारा कोणीतरी सापडला आहे, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by yogen shah (@yogenshah_s)

त्यामुळे कंगना लवकरच लग्न करणार असल्याचंही म्हटलं जात आहे. कंगना आणि या मिस्ट्री बॉयची जोडी खूपच सुंदर असल्याचं चाहते म्हणत आहेत. मात्र तो नेमका कोण आहे, कुठला आहे याबाबत अजून काहीच खुलासा झाला नाहीये.. चाहते याबाबत उत्सुक आहेत.

महत्वाच्या बातम्या- 

Ayodhya Ram Mandir | अयोध्येत घर आणि जमिनीच्या खरेदी विक्रीत मोठी वाढ, किंमती ऐकाल तर थक्क व्हाल

Pune Metro तब्बल 36 मिनिटे बंद राहिली, कारण ऐकाल तर तुम्ही सुद्धा थक्क व्हाल

Pune Loksabha | पुण्यातून उमेदवारी हवीय?, भाजपतील इच्छुंकाची ‘ही’ क्षमता ठरणार गेमचेंजर

Stock Market | 6 महिन्यात पैसे दुप्पट, ‘या’ शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल

Petrol Diesel Price | ‘या’ शहरांमध्ये पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त, जाणून घ्या आजचे दर