Ayodhya Ram Mandir | 22 जानेवारी हा दिवस देशभरातील नागरिकांसाठी अतिशय मोठा क्षण असणार आहे. याच दिवशी अयोध्येमध्ये प्रभू श्रीराम परत येणार आहेत. म्हणजेच, भव्य अशा राम मंदिराचं (Ayodhya Ram Mandir) उद्घाटन केलं जाणार आहे. यासाठी अयोध्येत अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. देशभरात यासाठी जय्यत तयारी केली जात आहे. त्यामुळे देशातील वातावरण सध्या राममय झालं आहे. राम मंदिर उद्घाटन सोहळ्याचा प्रभाव हा रिअल इस्टेट क्षेत्रातही दिसून येत आहे.
रिअल इस्टेट क्षेत्रात सध्या जबरदस्त तेजी आली आहे. देश- विदेशातील मोठे हॉटेल व्यावसायिक आणि गुंतवणूकदार अयोध्येमध्ये मालमत्ता खरेदी करत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे आयोध्येमध्ये सध्या जमिनी आणि इमारतीच्या किमती चार ते दहा पट वाढल्या आहेत.
अयोध्येत रिअल इस्टेट क्षेत्र तेजीत
राम मंदिर (Ayodhya Ram Mandir) उद्घाटनमुळे या ठिकाणी व्यावसायिक जमीन घेण्यासाठी प्रयत्नशील दिसत आहेत. यासोबतच स्थानिक लोकही तेथे जमीन खरेदी करून व्यवसाय करण्यास इच्छुक आहेत. मात्र अशातच येथील मालमत्तांचा भाव वधारतच चालला आहे. त्यामुळे अयोध्येत याचीही चर्चा रंगू लागली आहे.
एका अहवालानुसार, अयोध्या (Ayodhya Ram Mandir) शहराच्या बाहेर मालमत्तांच्या किमती 1500 रुपये चौरस फुटावरून तीन हजार रुपये चौरस फूट झाल्या आहेत. शहरामध्ये तर यात अजूनच वाढ झाली आहे. हेच दर शहरात चार हजार रुपयांवरून सहा हजार रुपयांवर गेले आहेत. या किंमती अजून वाढणार असल्याचं सध्या म्हटलं जात आहे. त्यामुळे सध्या रिअल इस्टेट क्षेत्रात एकच खळबळ माजली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मालमत्तांच्या किमतीत वाढ
रिअल इस्टेट क्षेत्रात राम मंदिरावर (Ayodhya Ram Mandir) सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतरही तेजी दिसून आली होती. अॅनाराॅक समूहाचे चेअरमन अनुज पुरी यांनीही याबाबत खुलासा केला. 2019 मध्ये राम मंदिराबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला. या निर्णयानंतर अयोध्येत रिअल इस्टेट क्षेत्रात प्रचंड तेजी सुरु झाली.
सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यापासून आतापर्यंत मालमत्तांच्या किमती तब्बल 30 % वाढल्या आहेत. 2019 मध्ये फैजाबाद रोडवर मालमत्तांच्या किमती 400 रुपये ते 700 रुपये चौरस फूट होत्या. त्या आता दोन हजार रुपयांपर्यंत पोहोचल्या आहेत. त्यामुळे मालमत्तांच्या किमती अजूनही वाढण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
News Title- Ayodhya Ram Mandir and Real estate
महत्त्वाच्या बातम्या-
Health Update | उपचार करुन सुद्धा खोकला जाईना???, मोठी माहिती आली समोर
Stock Market | 6 महिन्यात पैसे दुप्पट, ‘या’ शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल
Petrol Diesel Price | ‘या’ शहरांमध्ये पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त, जाणून घ्या आजचे दर
Ram Mandir | नवीन मंदिराचं उद्घाटन झाल्यावर सध्याच्या मंदिराचं काय करणार?, मोठी माहिती आली समोर
Atal Setu Toll l पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन, मात्र टोलचे दर ऐकून हैराण व्हाल