Ram Mandir | रामाच्या सासरवाडीवरुन बोलवले 21 हजार पुजारी, या गोष्टीची मोठी तयारी सुरु

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ram Mandir | येत्या 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिराचा (Ram Mandir) उद्धाटन सोहळा होणार आहे. यासाठी देशभरात जय्यत तयारी सुरु आहे. या सोहळ्यासाठी साधू-मुनींसह अनेक दिग्गजांना निमंत्रण देण्यात आलं आहे. या अभूतपूर्व सोहळ्यासाठी आता थेट प्रभू श्रीराम यांच्या सासरवाडीवरून  पुजारी येणार आहेत.

राम मंदिराच्या (Ram Mandir ) प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी 14 ते 25 जानेवारी दरम्यान शरयूच्या तीरावर ‘श्री राम नाम महायज्ञ’ या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी 21 हजार पुजारी येणार आहेत. या अभूतपूर्व सोहळ्यासाठी जोरदार तयारी करण्यात येत आहे.

1100 जोडपे राम मंत्राचा उच्चार करत हवन करणार

‘श्री राम नाम महायज्ञ’ करण्यासाठी 21 हजार पुजारी प्रभू रामाचे सासर असलेल्या नेपाळ येथून अयोध्येला पोहोचणार आहेत. राम मंदिरापासून (Ram Mandir ) दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या शरयू नदीच्या घाटावर याची तयारी करण्यात आली आहे. यासाठी शंभर एकरमध्ये 1008 तंबूंची टेंट सिटी उभारण्यात आली आहे. तसेच महायज्ञ करण्यासाठी 11 थरांचा यज्ञमंडप बांधण्यात येत आहे.

मुळचे अयोध्या आणि नेपाळमध्ये स्थायिक झालेले आत्मानंद दास महात्यागी या महायज्ञाचे नेतृत्व करणार आहेत. दरवर्षी मकर संक्रांतीला ते यज्ञ करतात. एकूण 100 कुंडांमध्ये 1100 जोडपे राम मंत्राचा उच्चार करत हवन करणार आहेत. तर शेवटच्या दिवशी शरयू तीरावर 1008 शिवलिंगचे विसर्जन करण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी 50 हजार भाविकांना राहण्यासाठी व्यवस्था करण्यात येणार आहे.

या महायज्ञ दरम्यान रामायण मधील 24 हजार श्लोकांचे जप केले जाणार आहेत. अकराशे जोडपे जेव्हा राम नामाचा जप करतील तेव्हाचे दृश्य नक्कीच डोळ्यांचं पारणं फेडणारं असेल. हा सोहळा ऐतिहासिक असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे. त्यामुळे सर्व देशवासीयांकडून या सोहळ्याची (Ram Mandir ) आतुरतेने वाट पहिली जात आहे.

राम मंदिरासाठी देशभरातून देण्यात आली देणगी

राम मंदिर (Ram Mandir ) उभारणीसाठी आतापर्यंत 5500 कोटींपेक्षा अधिक देणगी देण्यात आली आहे. यात सर्वाधिक देणगी रामकथा वाचक मोरारी बापू यांनी तब्बल 11.3 कोटी दिले आहेत. मात्र, त्यात सर्वाधिक चर्चा बिदुलाबाई देवर यांची होत आहे. छत्तीसगडमधील गरिआबंद जिल्ह्यातील राजीम येथील 85 वर्षीय बिदुलाबाई देवर या सफाई कामगार आहेत.

बिदुलाबाई देवर यांची रोजची कमाई अवघी 40 रुपये आहे. मात्र यातूनही त्यांनी दिवसाच्या कमाईतील अर्धा भाग दान केला. त्यांना राम मंदिर सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. यासोबतच छत्तीसगडच्या नरहरपूर येथील संतोषीबाई यांनाही निमंत्रण पाठवण्यात आले आहे. त्यांनी सुमारे 600 पोस्टमॉर्टममध्ये मदत केली आहे.

News Title- Ram Mandir Inauguration Ceremony

महत्त्वाच्या बातम्या- 

Health Update | उपचार करुन सुद्धा खोकला जाईना???, मोठी माहिती आली समोर

Stock Market | 6 महिन्यात पैसे दुप्पट, ‘या’ शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल

Petrol Diesel Price | ‘या’ शहरांमध्ये पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त, जाणून घ्या आजचे दर

Ram Mandir | नवीन मंदिराचं उद्घाटन झाल्यावर सध्याच्या मंदिराचं काय करणार?, मोठी माहिती आली समोर

Atal Setu Toll l पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन, मात्र टोलचे दर ऐकून हैराण व्हाल