Rakhi Sawant चा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Rakhi Sawant | अभिनेत्री राखी सावंत कायम चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील राखी सावंतची फॅन फॉलोइंग काही कमी नाही. आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर चाहत्यांसाठी राखी नवनवीन फोटो शेअर करत असते. काही महिन्यांपूर्वी राखी सावंतने पती आदिल खान दुरानीवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर त्यांचं हे प्रकरण वाढलं. आदिल खान दुरानीने राखी सावंतविरोधात तक्रार दाखल केली होती. मात्र आता राखी सावंतला कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते.

काय आहे नेमकं प्रकरण?

अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. दरम्यान सध्या राखी सावंतला कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते. या मागचं कारण म्हणजे, राखीवर पती आदिलने खाजगी व्हिडीओ लीक केल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली होती.

दरम्यान, मुंबई सत्र न्यायालयाने राखी सावंतचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. राखी सावंत हिच्यावर भारतीय दंड संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या संबंधित कलमांसोबतच मानहानीच्या इतर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नक्की काय घडलं?

राखी सावंतने (Rakhi Sawant) कोणाच्याही न कळत आदिल दुर्रानी खानसोबत लग्नगाठ बांधली होती. मात्र अगदी काही दिवसातच या दोघांच्या नात्यामध्ये मतभेद झाले आणि आदिलची बदनामी व्हावी या हेतूने राखी सावंतने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केल्याचा दावा आदिलने केला.

त्यानंतर आदिलने राखी सावंतवर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. व्हायरल व्हिडीओ हा कमीत कमी 25 ते 30 मिनीटांचा होता. शिवाय आदिलच्या म्हणण्यानूसार राखीने मुद्दाम तो व्हिडीओ एका टीव्ही शोमध्ये दाखवला ज्यामध्ये दोघांचे इंटिमेट सीन होते.

आदिलनेच व्हिडीओ व्हायरल केला?

राखी सावंतच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनूसार आदिल दुरानी स्वतः हा त्यांचा इंटिमेट व्हिडीओ व्हायरल केला. त्यामुळे या दोघांपैकी नेमकं खरं कोण बोलत आहे यावर प्रश्न उपस्थित केला जात आहे. राखी सावंत हिने काही दिवसांपूर्वीच खुलासा करत थेट म्हटलंय की, आदिल दुरानी खान याने फक्त आणि फक्त बिग बाॅसच्या घरात सहभागी होण्यासाठी माझ्यासोबत लग्न केलं. राखीचं हे बोलणं ऐकून लोक हैराण झाले.

News Title | rakhi sawant video gets viral

महत्त्वाच्या बातम्या-

Health Update | उपचार करुन सुद्धा खोकला जाईना???, मोठी माहिती आली समोर

Stock Market | 6 महिन्यात पैसे दुप्पट, ‘या’ शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल

Petrol Diesel Price | ‘या’ शहरांमध्ये पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त, जाणून घ्या आजचे दर

Ram Mandir | नवीन मंदिराचं उद्घाटन झाल्यावर सध्याच्या मंदिराचं काय करणार?, मोठी माहिती आली समोर

Atal Setu Toll l पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन, मात्र टोलचे दर ऐकून हैराण व्हाल