Iphone सारखा फील देईल हा फोन, किंमत फक्त 7500 रुपये!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Iphone | आयफोन आपल्या खिशात असावा, तो घेऊन वावरावं हे अनेकांचं स्वप्न असतं. आयफोनच्या डायनॅमिक आयलंड वैशिष्ट्यानं संपूर्ण जगाला भुरळ घातली आहे. आयफोनची एवढी क्रेझ आहे की, अनेक नामवंत कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी या फोनमधील काही फीचर्स देण्याचा प्रयत्न करत असतात. अनेक स्मार्टफोन कंपन्या त्यांच्या नवीन मॉडेल्समध्ये आयफोनमध्ये असणारे समान फीचर्स देत आहेत. त्यातीलच एक नाव म्हणजे Infinix चा नवीन स्मार्टफोन Infinix Smart 8.

Infinix Smart 8 ग्राहकांच्या भेटीला आला आहे. या स्मार्टफोनमध्ये आयफोनसारखी काही फीचर्स आहेत. यातील डायनॅमिक आयलंडसारखे वैशिष्ट्य ग्राहकांना आकर्षित करणारं आहे. Infinix ने भारतीय बाजारात नवीन फोन लाँच केला असून, या नवीनतम मॉडेलचं नाव Infinix Smart 8 आहे, ज्याकडे अतिशय स्वस्त स्मार्टफोन म्हणून पाहिलं जात आहे.

दरम्यान, Infinix Smart 8 स्मार्टफोनची किंमत सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी आहे. याशिवाय यामध्ये एक फीचर्स असे देखील आहे, जे ग्राहकांना आयफोनचा फील देते. हा स्मार्टफोन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवरून खरेदी करता येऊ शकतो. त्यामुळे खिशाला परवडणारा स्मार्टफोन म्हणून Infinix Smart 8 हा एक उत्तम पर्याय मानला जात आहे.

Infinix Smart 8 ची किंमत

Infinix च्या नवीन स्मार्टफोनची किंमत 7,500 एवढी आहे. कमी किमतीत नवीन मॉडेल सादर करण्यासाठी कंपनी सातत्याने प्रयत्न करत असते. Infinix Smart 8 मध्ये ग्राहकांना 5,000mAh बॅटरी सारखी वैशिष्ट्ये मिळतील. चला तर मग जाणून घेऊया या स्मार्टफोनची काही खास वैशिष्ट्ये आणि स्पेसिफिकेशन्स. खरं तर निवडक बँक ऑफर अंतर्गत या फोनच्या खरेदीसाठी 10 टक्के सवलत देखील उपलब्ध असेल.

Infinix Smart 8 हा एक 4G स्मार्टफोन आहे, जो 6.6 इंच HD+ IPS डिस्प्लेसह येतो. यात 90 Hz चा स्क्रीन रिफ्रेश रेट आणि 500 ​​nits चा पीक ब्राइटनेस ग्राहकांचं लक्ष वेधतो. Infinix चा नवीन स्मार्टफोन मॅजिक रिंग फीचरसह येतो. आयफोनच्या डायनॅमिक आयलंडसारखे हे एक वैशिष्ट्य आहे.

 

Iphone सारखा फील देणारा स्मार्टफोन

स्वस्तात मस्त असलेला Infinix चा नवीन हँडसेट ऑक्टा-कोर Helio G36 चिपसेटसह येतो. हा स्मार्टफोन Android 13 Go वर आधारित XOS वर चालतो. पॉवर बॅकअपसाठी नवीन फोन 5,000 mAh बॅटरीसह येईल, ज्यामुळे लांबच्या प्रवासाला जायचं असल्यास ग्राहकांना चार्जिंगची चिंता नसेल. ज्याला 10W च्या अडॅप्टरने चार्ज करता येऊ शकते. यात इतर फोनप्रमाणे वाय-फाय, ब्लूटूथ 5.0 आणि मायक्रोएसडी कार्ड स्लॉट आहे.

Infinix Smart 8 मध्ये मेन कॅमेरा 50MP आणि 8MP फ्रंट कॅमेरा आहे. 4GB + 64GB स्टोरेज व्हेरिएंट 7,499 रुपयांना उपलब्ध असेल. चार रंगांच्या पर्यायांमध्ये असलेला हा स्मार्टफोन ग्राहकांना रंग निवडीचीही संधी देतो. गॅलेक्सी व्हाइट, रेनबो ब्लू, शायनी गोल्ड आणि टिंबर ब्लॅक या चार रंगांमध्ये Infinix Smart 8 उपलब्ध आहे. Infinix च्या नवीन फोनची विक्री Flipkart वर 15 जानेवारी दुपारी 12 वाजल्यापासून सुरू होणार आहे.

 महत्त्वाच्या बातम्या –

‘Kangana Ranaut ला हृतिकसारखा दिसणारा मुलगा सापडला’; ड्रामा क्वीन पडली प्रेमात?

Aamir Khan | आमिरच्या लेकीचं ‘ग्रँड वेडिंग रिसेप्शन’; ‘इतके’ पाहुणे राहणार उपस्थित

कहर! Whatsapp मेसेज सीन करुनही रिप्लाय दिला नाही, पत्नीने पतीसोबत केलं ‘हे’ कृत्य!

Pune News | दादा-भाईंचं आता काही खरं नाही!, पुण्यातील ‘या’ 21 गॅंगसाठी पोलिसांचा खास प्लॅन

Horoscope 2024 | ‘या’ राशींच्या व्यक्तींवर होईल लक्ष्मीची कृपा; वाचा राशीभविष्य