Pune News | दादा-भाईंचं आता काही खरं नाही!, पुण्यातील ‘या’ 21 गॅंगसाठी पोलिसांचा खास प्लॅन

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Pune News | पुण्यातील गुंड शरद मोहोळला त्याच्याच घरासमोर गोळ्या झाडून मारण्यात आलं. या घटनेनंतर पुण्यातील (Pune News) पोलीस प्रशासनावर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. या घटनेनंतर आता पुणे पोलिसांनी एक मोठी मोहीम हाती घेतली आहे. शहरातील 21 गॅंगमधील या दादा-भाईंची दादागिरी संपण्यासाठी आता पोलिसांनी खास प्लॅन आखला आहे. यासाठी प्रत्येक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.

गुंडांची ही टोळी सोशल मीडियावरी सक्रिय असते. याचाच वापर करून ते दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे पोलिसांची आता (Pune News) सोशल मिडियावर देखील कडक नजर असणार आहे. यासाठी एक विशेष टीम काम करणार आहे. त्यामुळे आता प्रत्येक पोस्टवर पोलिसांची नजर असणार आहे.

सोशल मिडियावर पोलिसांची नजर

शरद मोहोळची हत्या (Pune News ) करणारा साहिल उर्फ मुन्ना पोळेकर हा अवघ्या 20 वर्षांचा आहे. मात्र, त्यानेच पिस्तूलाने गोळ्या झाडून आपला मित्र शरद मोहोळची हत्या केली. इतक्या लहान वयात त्याच्यात गुन्हेगारी प्रवृत्ती कशी काय निर्माण झाली, हा सवाल पोलिसांना पडला आहे. मुन्ना हा सोशल मिडियावरही सक्रिय होता. यातूनच तो गुन्हेगारीच्या वळणावर कसा गेला याची प्रचिती येते.

त्यामुळे पोलीस (Pune News) आता या गुंडांच्या सोशल मिडियावर लक्ष ठेवणार आहेत. ते पोस्ट काय करत आहेत, काय संदेश देत आहेत यावर पोलिस नजर ठेऊन असणार आहेत. पोलिसांनी शहरातील गुन्हेगारीचा अंदाज घेतल्यावर त्यांना यात तरुणांचा सहभाग मोठा असल्याचं निदर्शनास आलं.

शहरात छोटे छोटे मुलेही दादा-पंटर लोकांच्या सहवासात राहतात. त्यामुळे गल्ली गल्लीत या किशोरवयीन मुलांची टोळी बनत आहे.यांनी लहान-सहान गुन्हा केला की, मोठे गुन्हेगार यांना अजून मोठा गुन्हा करण्यास प्रवृत्त करतात. त्यामुळे पोळीस आता या टोळ्यांवरही नजर ठेवणार आहेत.

Pune News | पुणे पोलिसांचे पथक करणार कारवाई

शरद मोहोळ (sharad mohol) हत्येप्रकरणी (Pune News) आतापर्यंत दोन वकिलांसह दहा जणांना अटक करण्यात आली आहे. त्याच्या हत्येबाबत रोज काही न काही खुलासे होत आहेत. मुन्नाने हत्येपूर्वी मुळशी येथे पिस्तूल चालवण्याचा सराव केल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे पुण्यात गुन्हेगारांचा वावर वाढत असल्याचे म्हटले जात आहे.

ही गुन्हेगारी वृत्ती अजून वाढू नये, म्हणून पुणे पोलिसांकडून मोठी खबरदारी घेण्यात येत आहे. यासाठी (Pune News) पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी एक पथक तयार केले आहे. या पथकाद्वारे गुन्हेगारांवर कडक नजर ठेवण्यात येणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

Atal Setu Toll l पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन, मात्र टोलचे दर ऐकून हैराण व्हाल

Health Update | उपचार करुन सुद्धा खोकला जाईना???, मोठी माहिती आली समोर

Ram Mandir | नवीन मंदिराचं उद्घाटन झाल्यावर सध्याच्या मंदिराचं काय करणार?, मोठी माहिती आली समोर

Petrol Diesel Price | ‘या’ शहरांमध्ये पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त, जाणून घ्या आजचे दर

Stock Market | 6 महिन्यात पैसे दुप्पट, ‘या’ शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल