सर्वात स्वस्त SUV! Hyundai Creta, Kia Seltosला टाकलं मागे; 83 हजारांनी स्वस्त

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

SUV Cars | SUV कार खरेदी करण्यासाठी इच्छुक असलेल्यांना खुशखबर मिळाली आहे. कारण देशातील सर्वात स्वस्त मध्यम आकाराच्या SUV ची एन्ट्री झाली आहे. Hyundai Creta आणि Kia Seltos सारख्या SUV च्या तुलनेत, MG Motor हा नवीन प्रकार लॉन्च करण्यात आला आहे. ही SUV सर्वात कमी किती किंमतीत लॉन्च झाली असून तिची कमी किंमतच ग्राहकांना आकर्षित करत आहे. भारतीय बाजारपेठेत SUV ची भलतीच क्रेझ आहे. ग्राहकांचं लक्ष वेधण्यात SUV ला यश आलं आहे. त्यामुळं कंपनीनं आता एसयूव्हीचे नवीन मॉडेल लॉन्च केलं.

MG Astor 83 हजारांनी स्वस्त

ब्रिटिश ऑटो ब्रँड MG Motor ने MG Astor चे नवीन व्हेरिएंट लॉन्च केलं आहे. खरं तर आता ही कार देशातील सर्वात स्वस्त मध्यम आकाराची एसयूव्ही बनली आहे. Astor च्या सर्वात स्वस्त स्प्रिंट मॉडेलची एक्स-शोरूम किंमत 9.98 लाख रुपये एवढी आहे. भारतात ही कार Hyundai Creta आणि Kia Seltos सारख्या SUV ला टक्कर देते. MG ने अनेक आकर्षित करणाऱ्या वैशिष्ट्यांसह Astor ग्राहकांच्या भेटीला आणली आहे.

दरम्यान, MG Astor आता भारतातील सर्वात स्वस्त मध्यम आकाराची SUV बनली आहे. ब्रिटीश कार कंपनी या कारची चार व्हेरिएंटमध्ये विक्री करते. ज्यात स्प्रिंट, शाइन, सिलेक्ट, शार्प प्रो आणि सॅव्ही प्रो यांचा समावेश आहे. यापूर्वी ही कार स्टाइल, स्मार्ट, शार्प आणि सॅव्ही ट्रिममध्ये उपलब्ध होती.

SUV Cars ची ग्राहकांना भुरळ

MG Astor च्या सर्वात स्वस्त व्हेरिएंटची किंमत 83,000 रुपयांनी कमी करण्यात आली आहे. अर्थात ही कार 83 हजारांनी स्वस्त झाली आहे. यापूर्वी, स्टाईल हा सर्वात स्वस्त व्हेरिएंट होता, ज्याची एक्स-शोरूम किंमत 10.81 लाख रुपये होती. आतापर्यंत एमजी कंपनी तीन ट्रिममध्ये टर्बो-पेट्रोल इंजिन ऑप्शन विकायची, जो आता फक्त सर्वात महाग Savvy Pro ट्रिममध्ये उपलब्ध असेल. Astor ही भारतातील सर्वात सुरक्षित SUV मानली जाते.

MG Astor ची काही वैशिष्ट्ये

2024 MG Astor च्या नवीन वैशिष्ट्यांबद्दल भाष्य करायचे तर, यामध्ये हवेचा गारवा फील करण्यासाठी फ्रंट सीट, वायरलेस चार्जिंग, वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि Apple CarPlay, ऑटो डिमिंग IRVM सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. याशिवाय LED हेडलॅम्प, DRLs, ड्युअल-टोन इंटीरियर, सॉफ्ट-टच डॅशबोर्ड, 10.1 इंच इंफोटेनमेंट सिस्टम यासारखी वैशिष्ट्ये सर्वात स्वस्त व्हेरिएंटमध्ये प्रदान करण्यात आली आहेत.

 

नवीन Astor च्या स्पेसिफिकेशन्समध्ये कोणताही बदल नाही. ही एसयूव्ही 1.5 लीटर नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड, 4 सिलेंडर पेट्रोल इंजिनच्या पॉवरसह येते. पॉवर ट्रान्समिशनसाठी 5 स्पीड मॅन्युअल आणि 8 स्टेप सीव्हीटी ऑटोमॅटिक गिअरबॉक्स देण्यात आला आहे. तसेच 1.3 लीटर 3 सिलेंडर टर्बो-पेट्रोल इंजिन पर्याय उपलब्ध आहे, त्यामुळे ग्राहकांची चिंता मिटेल. तसेच एमजी Astor मध्ये 6 स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्स उपलब्ध आहेत.

 महत्त्वाच्या बातम्या –

Iphone सारखा फील देईल हा फोन, किंमत फक्त 7500 रुपये!

‘Kangana Ranaut ला हृतिकसारखा दिसणारा मुलगा सापडला’; ड्रामा क्वीन पडली प्रेमात?

Aamir Khan | आमिरच्या लेकीचं ‘ग्रँड वेडिंग रिसेप्शन’; ‘इतके’ पाहुणे राहणार उपस्थित

कहर! Whatsapp मेसेज सीन करुनही रिप्लाय दिला नाही, पत्नीने पतीसोबत केलं ‘हे’ कृत्य!

Pune News | दादा-भाईंचं आता काही खरं नाही!, पुण्यातील ‘या’ 21 गॅंगसाठी पोलिसांचा खास प्लॅन