IND vs ENG | सूर्याचा डेब्यू, ध्रुवला संधी! पण 70 ची सरासरी असलेल्या मुंबईकर खेळाडूला ‘धोका’

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

IND vs ENG | इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. काही नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली असली तरी, अपेक्षित चेहरे अद्याप प्रतिक्षेत आहेत. युवा ध्रुव जुरेलला आगामी मालिकेतील सुरूवातीच्या दोन सामन्यांमध्ये संधी मिळाली आहे. बीसीसीआयच्या निवड समितीने शुक्रवारी इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी संघाची घोषणा केली. या संघ निवडीने अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यात एका नावाचा समावेश होता, ज्याचा कोणी विचारही केला नव्हता. ते नाव म्हणजे ध्रुव जुरेल.

सर्फराजला संधी कधी?

देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने धावा करत आलेल्या ध्रुवला मोठ्या व्यासपीठावर खेळण्याची संधी मिळाली आहे. पण, मुंबईकर खेळाडू सर्फराज खानला मात्र अद्याप संधी मिळालेली नाही. सर्फराज देखील देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडत आहे. अलीकडेच पार पडलेला आयपीएलचा मिनी लिलाव गोलंदाजांच्या बाजूने राहिला अन् सर्फराजला एकही खरेदीदार मिळाला नाही.

IND vs ENG साठी युवा ध्रुवेलला संधी

दरम्यान, यष्टिरक्षक फलंदाज ध्रुव जुरेलला भारतीय संघात स्थान मिळाले आहे. पहिल्या दोन सामन्यांपैकी एका सामन्यातून त्याचे पदार्पण होईल असे अपेक्षित आहे. मागील आयपीएल हंगामात राजस्थान रॉयल्सकडून स्फोटक खेळी करून चर्चेत आलेला जुरेल सातत्याने छाप पाडत आहे. पण, त्याला कसोटी संघात स्थान मिळेल याची कोणालाच कल्पना नव्हती. कारण आधीच टीम इंडियात दोन यष्टीरक्षक आहेत.

सर्फराज खान मागील दोन-तीन वर्षांत सातत्याने धावा करत आला आहे. कोविडमुळे क्रिकेट थांबण्यापूर्वी देखील सर्फराजची बॅट चमकत आहे. 2021-22 मध्ये तो रणजी ट्रॉफीमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला होता. इराणी ट्रॉफीमध्येही तो चमकला होता आणि भारत अ संघाकडून खेळताना त्याने प्रभावी कामगिरी केली होती. मात्र आजपर्यंत त्याला कसोटी संघात स्थान मिळालेले नाही.

इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या दोन सामन्यांसाठी शुक्रवारी भारतीय संघाची घोषणा झाली. संघ निवडीनंतर सर्फराजने शनिवारीच भारत-अ संघाकडून खेळताना इंग्लंड लायन्सविरुद्ध 96 धावा कुटल्या. प्रथम श्रेणीतील सर्फराजची सरासरी 69.66 म्हणजेच जवळपास 70 आहे पण तरीही त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे तिकिट मिळाले नाही. त्याच्याआधी ट्वेंटी-20 स्पेशालिस्ट सूर्यकुमार यादवला कसोटी संघात संधी मिळाली. त्याने 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी पदार्पण देखील केले. सर्फराज खानची सरासरी पाहता दोन कसोटी सामन्यांसाठी निवडलेल्या संघात त्याला संधी मिळणे अपेक्षित होते.

पहिल्या दोन सामन्यांसाठी भारतीय संघ –

रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक) आणि आवेश खान.

 महत्त्वाच्या बातम्या –

सर्वात स्वस्त SUV! Hyundai Creta, Kia Seltosला टाकलं मागे; 83 हजारांनी स्वस्त

Iphone सारखा फील देईल हा फोन, किंमत फक्त 7500 रुपये!

‘Kangana Ranaut ला हृतिकसारखा दिसणारा मुलगा सापडला’; ड्रामा क्वीन पडली प्रेमात?

Aamir Khan | आमिरच्या लेकीचं ‘ग्रँड वेडिंग रिसेप्शन’; ‘इतके’ पाहुणे राहणार उपस्थित

कहर! Whatsapp मेसेज सीन करुनही रिप्लाय दिला नाही, पत्नीने पतीसोबत केलं ‘हे’ कृत्य!