Animal | ॲनिमल चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरील घौडदौड अद्याप कायम आहे. ॲनिमल चित्रपटाने भरघोस कमाई करून अनेक विक्रम मोडले. स्टार अभिनेता रणबीर कपूरने त्याच्या कारकिर्दीतील आतापर्यंतचा सर्वात मोठा ब्लॉकबस्टर चित्रपट देऊन स्वत:ला पुन्हा एकदा सिद्ध केले. रणबीरने अनेक सुपरहिट चित्रपट दिले असले तरी त्याला यापूर्वी ॲनिमलसारखे यश मिळाले नव्हते. या चित्रपटाने त्याचा टॉप स्टार्सच्या यादीत समावेश केला आहे आणि आपल्या कामाने लोकांना आपलेसे बनवण्यात यश मिळवले.
खरं तर ॲनिमलमध्ये दाखवलेल्या हिंसाचारावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. मात्र, टीकाकारांपेक्षा चित्रपट पाहणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने चित्रपट प्रदर्शित होऊन महिना उलटला तरी चित्रपटगृहांमध्ये लाखोंची कमाई होत आहे. या चित्रपटातील रणबीरच्या अभिनयाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. चित्रपट ब्लॉकबस्टर झाल्याने रणबीर मागील एका महिन्यापासून प्रसिद्धीच्या झोतात आहे. ॲनिमलने प्रदर्शित झाल्याच्या पहिल्याच दिवशी सिद्ध केले होते की हा चित्रपट एक मोठी इनिंग खेळणार आहे.
Animal ची बक्कळ कमाई!
चित्रपट प्रदर्शित होण्याच्या 44 व्या दिवशी देखील चित्रपटगृहांमधून कमाई सुरू आहे. आता ॲनिमलच्या नेत्रदीपक यशाचा परिणाम रणबीरच्या फीवरही दिसून येत आहे. या चित्रपटाच्या प्रचंड यशानंतर आता रणबीर कपूरने आपली फी वाढवल्याचे बोलले जात आहे. ॲनिमलच्या यशाचा परिणाम बॉक्स ऑफिसवरच नाही तर रणबीर कपूरच्या फीवरही दिसून येत आहे. माहितीनुसार, रणबीरने त्याची फी 30 वरून 65 कोटी रुपये केली आहे.
दरम्यान, रणबीर कपूरच्या आधी अनेक बड्या स्टार्सनी हे पाऊल उचलले आहे. एखादा चित्रपट गाजला किंवा बक्कळ कमाई करून गेला की अनेकदा कलाकार आपले मानधन वाढवतात. मागील काही काळापासून बॉलिवूडचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही कमाल करू शकले नव्हते. पण, ॲनिमल याला अपवाद ठरला. नामांकित कलाकारांचे चित्रपट फ्लॉप होत असतानाच रणबीरने मात्र बक्कळ कमाई केली.
रणबीरचा ‘भाव’ वाढला
एकापाठोपाठ एक चित्रपट फ्लॉप झाल्यास कलाकार आपले मानधन कमी करतात. ज्याप्रकारे अक्षय कुमारने त्याच्या चित्रपटांसाठी अनेकवेळा केले आहे. ॲनिमलच्या आधी रणबीर कपूर संजू चित्रपटात दिसला होता. या चित्रपटासाठी त्याला खूप प्रशंसा मिळाली आणि चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर उत्कृष्ट कामगिरी केली. त्याचबरोबर ‘अॅनिमल’ प्रदर्शित होण्याच्या 44 व्या दिवशी देखील लाखोंचा व्यवसाय करत आहे. या चित्रपटाच्या कमाईने आता 1000 कोटींचा आकडा गाठला आहे.
रणबीर कपूरच्या मागील संजू चित्रपटाचे लाइफटाईम कलेक्शन 342.53 कोटी आहे. मात्र, ॲनिमलच्या एन्ट्रीने हा विक्रम मोडला आहे. आता चाहते रणबीरच्या आगामी प्रोजेक्ट्सची आतुरतेने वाट पाहत आहेत. रणबीर त्याच्या पुढच्या चित्रपटासाठी किती मानधन घेतो हे पाहण्याजोगे असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
IND vs ENG | सूर्याचा डेब्यू, ध्रुवला संधी! पण 70 ची सरासरी असलेल्या मुंबईकर खेळाडूला ‘धोका’
सर्वात स्वस्त SUV! Hyundai Creta, Kia Seltosला टाकलं मागे; 83 हजारांनी स्वस्त
Iphone सारखा फील देईल हा फोन, किंमत फक्त 7500 रुपये!
‘Kangana Ranaut ला हृतिकसारखा दिसणारा मुलगा सापडला’; ड्रामा क्वीन पडली प्रेमात?
Aamir Khan | आमिरच्या लेकीचं ‘ग्रँड वेडिंग रिसेप्शन’; ‘इतके’ पाहुणे राहणार उपस्थित