Ram Mandir | “बाबरवर जास्त प्रेम, रामावर नाही…”, मुख्यमंत्र्यांचा काँग्रेसवर हल्लाबोल

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ram Mandir | 22 तारखेला होणाऱ्या राम मंदिराच्या कार्यक्रमाच्या उद्घाटनावरून राजकारण चांगलेच तापले आहे. काँग्रेस हायकमांडने प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमाला जाणार नसल्याचं स्पष्ट करताच सत्ताधारी भाजपनं त्यांना लक्ष्य करण्यास सुरूवात केली. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी अयोध्येतील राम मंदिराच्या अभिषेक कार्यक्रमात सहभागी न होणाऱ्या काँग्रेसवर ताशेरे ओढले आहेत. ते म्हणाले की, काँग्रेसनं आयुष्यभर पाप केलं. राम मंदिर बांधू नये म्हणून त्यांनी अनेक कारस्थानं केली. बाबर त्यांना अधिक प्रिय आहे. बाबरकडे जाण्यात काँग्रेसला रस आहे, पण रामाकडं जाणं त्यांना चांगलं वाटत नाही. ते पापी होते आणि पापीच राहतील.

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांना त्यांच्या आक्रमक शैलीसाठी ओळखलं जातं. ते शनिवारी गुवाहाटी इथं एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी बोलताना त्यांनी इतिहासाची पानं वाचत काँग्रेसवर सडकून टीका केली. हिमंता बिस्वा सरमा गुवाहाटीहून पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आले असून, भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुकांत मजुमदार आणि इतर नेत्यांनी त्यांचे स्वागत केलं.

Ram Mandir अन् राजकारण तापलं

22 जानेवारीला होणाऱ्या राम मंदिराच्या भव्य कार्यक्रमासाठी सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि अधीर रंजन चौधरी यांच्यासह काँग्रेस नेत्यांना निमंत्रण देण्यात आलं होतं. परंतु काँग्रेसनं हा कार्यक्रम भाजप आणि आरएसएसचा असल्याचं सांगत कार्यक्रमास जाणार नसल्याचं सांगितलं. यावरून भाजप नेते काँग्रेसवर सातत्याने हल्लाबोल करत आहेत. काँग्रेसनं निमंत्रण नाकारताच आसामचे मुख्यमंत्री आक्रमक झाले.

 

दरम्यान, यापूर्वी मुख्यमंत्री सरमा यांनी खासदार राहुल गांधींचा 2005 मध्ये अफगाणिस्तानातील काबूल येथील बाबरच्या समाधीजवळील फोटो शेअर केला होता. त्यात त्यांनी लिहिलं होतं की, काँग्रेस रामललासमोर नव्हे तर बाबरपुढे झुकेल. नेहरूंपासून राहुल गांधींपर्यंत सर्वांनी बाबरच्या समाधीला भेट दिल्याचं त्यांनी सांगितलं होतं. त्यांनी लिहिलं की, 2005 मध्ये राहुल गांधींसह गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी अफगाणिस्तानला जाऊन बाबरच्या समाधीचं दर्शन घेतलं होतं. मग रामललाबद्दल इतका द्वेष का?

 

काँग्रेस हिंदूंचा इतका द्वेष का करते? असा प्रश्न आसामच्या मुख्यमंत्र्यांनी केला. तसेच ते म्हणाले की, काँग्रेसनं 22 जानेवारी रोजी राम मंदिर प्राणप्रतिष्ठेला उपस्थित राहण्यास नकार दिला हे चांगले आहे कारण त्यांच्या उपस्थितीमुळं कार्यक्रम बिघडला असता.

खरं तर काँग्रेस हे निमंत्रण स्वीकारून हिंदू समाजाची माफी मागू शकली असती, असं सरमा यांनी यापूर्वी म्हटलं होतं. सरमा यांनी सोमनाथ मंदिराच्या पुनर्बांधणीचा मुद्दा देखील उपस्थित केला. त्यांनी सांगितलं की, पंडित नेहरूंनी जे सोमनाथ मंदिराबाबत केलं, तेच काँग्रेस नेतृत्वानं आता राम मंदिराबाबत केलं. इतिहास त्यांना हिंदूविरोधी पक्ष ठरवत राहील, यात शंका नसल्याचं सिरमा यांनी अधिक सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या –

Animal ची बक्कळ कमाई! रणबीरचा ‘भाव’ वाढला; आता चित्रपटांसाठी घेणार इतके कोटी

IND vs ENG | सूर्याचा डेब्यू, ध्रुवला संधी! पण 70 ची सरासरी असलेल्या मुंबईकर खेळाडूला ‘धोका’

सर्वात स्वस्त SUV! Hyundai Creta, Kia Seltosला टाकलं मागे; 83 हजारांनी स्वस्त

Iphone सारखा फील देईल हा फोन, किंमत फक्त 7500 रुपये!

‘Kangana Ranaut ला हृतिकसारखा दिसणारा मुलगा सापडला’; ड्रामा क्वीन पडली प्रेमात?