Shruti Marathe | ‘तू माझ्यासोबत झोपली तर…’; श्रुती मराठेचा अत्यंत धक्कादायक खुलासा

Shruti Marathe | मनोरंजनाचं हे जग पैसा, प्रसिद्धी आणि ग्लॅमरने भरलेलं असलं तरी याचं वास्तव काही वेगळं असल्याचं कधी कधी पाहायला मिळतं. मनोरंजन विश्वात बाहेरून कितीही झगमगाटी दिसली तरी आतील वास्तव आणि काळं सत्य हे केवळ त्यात वावरणाऱ्या लोकांनाच ठावूक असतं. कास्टिंग काऊच हा देखील याचाच एक भाग आहे.

श्रुती मराठेने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव

अनेक अभिनेत्रींना कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव येतो. मराठमोळी अभिनेत्री श्रुती मराठे (Shruti Marathe) हिला देखील करिअरच्या सुरुवातीच्या काळात कास्टिंग काऊचचा अनुभव आला होता. नुकत्याच एका मुलाखतीत तिने याचा खुलासा केला आहे.

श्रुतीनं ही मुलाखत ‘आरपार’ या युट्यूब चॅनेलला दिली होती. या मुलाखतीत श्रुती म्हणाली की एक मुलगी म्हणून मला अनेक नाही पण काही मर्यादा आहेत हे जाणवलं. पण त्यातही एखादी गोष्ट सांगितली तर इतका काही फार प्रॉब्लम होत नाही. अनेक वर्षांपूर्वी मला मराठीत कास्टिंग काऊचचा अनुभव आला होता, असं श्रुतीने सांगितलं.

Shruti Marathe | “हे ऐकायला खूप घाण वाटतं”

अभिनय क्षेत्रात येऊन मला काही वर्ष झाली होती. त्यामुळे मी काही नवीन नव्हते. नटी उपलब्ध असतात, असा आपल्या चित्रपटसृष्टीविषयी असलेला मोठा गैरसमज आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे ऐकायला खूप घाण वाटतं. हे कोणी पसरवलं? कसं सुरू झालं? एखादं काम मिळवण्यासाठी तुम्हाला अमूक एक गोष्ट करावीच लागते, हे कुठून आलं?, असा सवाल श्रुतीने केला.

मी एका चित्रपटाच्या निमित्ताने मी एका फायनान्सरला भेटले होते. चित्रपटाचं सगळं ठरलं. मग मानधनाची बोलणी सुरू झाली. मी माझी फीस किती असतील ते त्यांना सांगितलं. मात्र त्यावर त्यांनी जे म्हटलं ते ऐकून मी गोंधळून गेले. त्यांनी अचानक मला सांगितलं की तू जर माझ्यासोबत झोपलीस तर मी तुला पाहिजे तितकं मानधन देईन. लक्षवेधी गोष्ट म्हणजे हे ते माझ्यासमोर म्हणाले. त्यांचं हे वाक्य ऐकल्यानंतर पुढचे दोन-तीन मिनिटं मी ब्लॅंक झाले होते, असा धक्कादायक खुलासा श्रुतीने केलाय.

श्रुती मराठेने या व्यक्तीला सडेतोड उत्तर देत म्हटलं की, मी जर तुमच्यासोबत झोपले तर, तुमची पत्नी फिल्मच्या अभिनेत्यासोबत झोपणार का?, असा सवाल श्रुतीने समोरच्या व्यक्तीला केला.

महत्त्वाच्या बातम्या- 

Bigg Boss 17 | सुशांतबद्दल बोलू नकोस, कारण तुझ्या सासरचे… अंकिताला आईचा मोठा सल्ला

Team India | भारतीय संघाच्या भल्यासाठी काम करायचंय; Yuvraj Singh ने मागितलं महत्त्वाचे पद

Congress ला मुंबईत मोठं खिंडार; माजी खासदार Milind Deora यांचा पक्षाला जय महाराष्ट्र!

Ram Mandir | “बाबरवर जास्त प्रेम, रामावर नाही…”, मुख्यमंत्र्यांचा काँग्रेसवर हल्लाबोल

Animal ची बक्कळ कमाई! रणबीरचा ‘भाव’ वाढला; आता चित्रपटांसाठी घेणार इतके कोटी