Team India | भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने भारतीय संघासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सिक्सर किंग म्हणून ओळख असलेल्या युवराजने आपल्या काळात भल्याभल्या गोलंदाजांना घाम फोडला. भारतीय संघाला मागील एक दशकापासून आयसीसीचा एकही किताब जिंकता आला नाही. मागील वर्षी पार पडलेल्या वन डे विश्वचषकातून हा डाग पुसला जाईल असे अपेक्षित असताना ऑस्ट्रेलियाने भारताच्या तोंडचा घास पळवला. अंतिम सामन्यात भारताचा पराभव झाला अन् तमाम भारतीयांचे स्वप्न धुळीस मिळाले.
भारताने शेवटच्या वेळी २०१३ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. त्यानंतर अद्याप भारताला एकदाही आयसीसीचा किताब जिंकता आला नाही. अशातच युवराज सिंगने संघाच्या भल्यासाठी काम करायची इच्छा असल्याचे बोलून दाखवले. कोलकाता येथे शनिवारी एका कार्यक्रमात युवराजने भविष्यात भारतीय संघाचा मार्गदर्शक म्हणून काम करायला आवडेल, अशी इच्छा व्यक्त केली. टीम इंडिया मागील काही काळापासून आयसीसीच्या मोठ्या स्पर्धा जिंकण्यात अपयशी ठरली आहे.
Team India अन् ICC ट्रॉफी
भारतीय संघाला मोठ्या व्यासपीठावर सातत्याने येत असलेले अपयश याबद्दल युवीने सांगितले की, टीम इंडियाला भविष्यात अधिक चांगली कामगिरी करावी लागेल. युवीने त्याचे स्वतःचे उदाहरण देताना म्हटले की, 2017 मध्ये मी जेव्हा फायनलमध्ये संघाचा भाग होतो तेव्हा टीम इंडियाचा पराभव झाला होता. भारतीय क्रिकेट संघाला गेल्या वर्षी एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला होता.
टीम इंडियाने 2013 साली शेवटची आयसीसी स्पर्धा जिंकली होती. तेव्हा भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. त्यावेळी टीम इंडियाने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली विजेतेपद पटकावले होते. विश्वचषकाबद्दल भाष्य करायचे झाले तर तर भारताने शेवटचा वर्ल्ड कप 2011 मध्ये जिंकला होता. त्यावेळीही टीम इंडियाने माहीच्या नेतृत्वाखाली वर्ल्ड चॅम्पियन होण्याचा मान मिळविला होता.
Team India साठी काम करायचंय – युवी
‘युवराज सेंटर ऑफ एक्सलन्स’च्या उद्घाटनावेळी टीम इंडियाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग म्हणाला, “मला वाटते आम्ही खूप फायनल खेळलो पण एकदाही जिंकू शकलो नाही. 2017 मध्ये मी यातीलच एका फायनलचा भाग होतो ज्यात आम्ही पाकिस्तानकडून पराभूत झालो होतो. येत्या काही वर्षांत यावर नक्कीच काम करावे लागेल. एक देश म्हणून आणि भारतीय संघ म्हणून आम्हाला दबावाखाली चांगली कामगिरी करावी लागेल. मला वाटते की काहीतरी चुकत आहे, जेव्हा एखादा मोठा सामना असतो तेव्हा आपण शारीरिकदृष्ट्या तयार असतो परंतु मानसिकदृष्ट्या आपल्याला मजबूत असणे आवश्यक आहे.”
मला मार्गदर्शक व्हायला आवडेल – युवराज सिंग
तसेच मला वाटते की, युवा खेळाडूंना प्रेरणा देणे, दबावाच्या स्थितीत कसे खेळावे याबद्दल सांगणे. हे एक भारतासाठी आव्हानात्मक राहिले आहे. आपल्या संघात प्रभावी खेळाडू आहेत पण दबावाच्या स्थितीत सर्वच खेळाडू प्रभाव टाकू शकत नाहीत. त्यामुळे मला संघाचा मार्गदर्शक व्हायला आवडेल. येत्या काही वर्षांत जेव्हा माझी मुले मोठी होतील, तेव्हा मी क्रिकेटशी पुन्हा जोडला जाईन आणि युवा खेळाडूंना मार्गदर्शन करेन. मला वाटते की मोठ्या स्पर्धांमध्ये आम्हाला अनेक मानसिक आव्हानांचा सामना करावा लागतो. मला विश्वास आहे की मानसिक दृष्टिकोनातून मी भविष्यात या खेळाडूंसोबत काम करू शकेन, असेही युवराजने सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या –
Congress ला मुंबईत मोठं खिंडार; माजी खासदार Milind Deora यांचा पक्षाला जय महाराष्ट्र!
Ram Mandir | “बाबरवर जास्त प्रेम, रामावर नाही…”, मुख्यमंत्र्यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
Animal ची बक्कळ कमाई! रणबीरचा ‘भाव’ वाढला; आता चित्रपटांसाठी घेणार इतके कोटी
IND vs ENG | सूर्याचा डेब्यू, ध्रुवला संधी! पण 70 ची सरासरी असलेल्या मुंबईकर खेळाडूला ‘धोका’
सर्वात स्वस्त SUV! Hyundai Creta, Kia Seltosला टाकलं मागे; 83 हजारांनी स्वस्त