आता इलेक्ट्रिक अवतारात Jimny, किंमतीबाबत मोठा खुलासा

Maruti Suzuki Jimny च्या पाच दरवाज्याच्या वेरियंटसाठी कंपनीनं नुकतंच बुकिंग सुरु केलं आहे. मारुती सुझुकीच्या या कारची भारतात चांगलीच प्रतीक्षा लागलेली आहे. त्याच पार्श्वभूमीवर सुझुकीने या कारबाबत मोठा खुलासा केला आहे. Jimnyचं इलेक्ट्रिक वर्जन लवकरच बाजारात येणार आहे.

सध्या एसयूव्ही गाड्यांची भारतीय मार्केटमध्ये जोरदार चलती पहायला मिळत आहे. याच धर्तीवर सुझुकीने आपली Jimny भारतीय बाजारात उतरवण्याचा निर्णय घेतला. भारतात सुझुकीचे चांगलेच चाहते आहेत, त्यामुळे या गाडीची चांगली ओढ लागलेली होती.

अखेर कंपनीनं या गाडीचं बुकिंग घ्यायला सुरुवात केली आहे. कंपनीनं या गाडीच्या किंमतीबाबतही लवकरच मोठा खुलासा करणार असल्याचं जाहीर केलं आहे, त्यामुळे खरी किंमत जाणून घेण्यासाठी चाहत्यांना आणखी वाट पाहावी लागणार आहे.

Jimny अजून बाजारात उतरली नाही तोच कंपनीने तिच्या इलेक्ट्रीक अवताराची देखील घोषणा केली आहे. मात्र त्याआधी कंपनीची eVX संकल्पनेवर आधारित गाडी भारतात लाँच केली जाईल. सिंगल चार्जमध्ये ही गाडी 550 किलोमीटर धावेल, असा कंपनीचा दावा आहे.

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More