कार्यकर्त्यांचं ऐकायचं की पवारांचं? एका निर्णयानं तुटणार महाविकास आघाडी?
पुणे | आमदार मुक्ता टिळक यांचं निधन झाल्यामुळे पुण्याच्या कसबा विधानसभा मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक होणार आहे. येत्या २७ फेब्रुवारीला याठिकाणी मतदान होणार आहे. मात्र आता या मतदारसंघात निवडणूक लढवण्यावरुन शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेस -राष्ट्रवादीमध्ये फूट पडण्याची शक्यता आहे.
शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची नुकतीच यासंदर्भात एक बैठक पार पडली, या बैठकीत कसब्याची जागा लढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने शहराध्यक्ष संजय मोरे यांना याठिकाणी उमेदवारी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
शिवसैनिकांच्या या भूमिकेमुळे मोठा पेच निर्माण झाला आहे. उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात अशीच भूमिका घेतली, तर महाविकास आघाडीत फूट पडण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना या पक्षांनी ही निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. भाजपकडे अनेक इच्छुक असल्याने भाजप कुणाला संधी देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. शैलेश टिळक यांच्यासह गणेश बीडकर, हेमंत रासने, धीरज घाटे यांची नावं सध्या चर्चेत आहेत.
Comments are closed.