भारीच की! 10 लाखांचं उत्पन्न तरीही तुम्ही टॅक्स फ्री होऊ शकता

नवी दिल्ली | नुकताच 2023-24 या वर्षाचं आर्थिक बजेट (Financial budget) सादर करण्यात आलं आहे. हे आर्थिक वर्ष संपत आलं असल्यानं अनेकजण आर्थिक नियोेजनात गुंतले आहेत. कर बचतीचे कोणते मार्ग आपल्याला वापरता येतील याचा विचार करत आहेत. साधारण पाहायला गेल्यास 5 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणत्याही प्रकारचा टॅक्स नसतो.

तुमचं वार्षिक उत्पन्न 10 लाख रुपये इतकं असेल तर तुम्हाला टॅक्स (Tax) भरावा लागतो. किंबहुना सध्याच्या या कर भरण्याच्या कायद्यामध्ये काही नियम देखील आहेत. या नियमांचा योग्य प्रकारे उपयोग केल्यास तुम्ही टॅक्स फ्री होऊ शकता.

तुमचं वार्षिक उत्पन्न 10 लाख असेल तर मानक वजावटीतून(standard deduction) तुम्ही 50,000 वजा करु शकता. त्यामुळं तुमचं करपात्र उत्पन्न 9.5 लाख रुपये होईल. याशिवाय आपल्याकडं जीवन विमा, सुकन्या समृद्ध योजना यांसारख्या योजनांमध्ये 80C अंतर्गत गुंतवणूक करु शकता. साधारणत 1.50 लाखांची गुंतवणूक केल्यास तुमचं करपात्र उत्पन्न 8 लाख इतकं होईल.

हा कर कमी करण्यासाठी तुम्ही NPS चा देखील फायदा घेऊ शकता. यामुळं तुम्हाला आणखी 50,000 देखील कमी करता येतील. तुम्ही तुमच्या आरोग्य विम्यावर (Health Insurance) 25 हजार रुपयांची सूट तर तुमच्या पालकांच्या आरोग्य विम्यावर 25 टक्क्यांची सूट मिळवू शकता. याशिवाय तुम्ही गृहकर्ज घेतल्यास त्यावर 2 लाखांपर्यंतची सूट तुम्ही मिळवू शकता.

उत्पन्न कलम 84 (A) चा फायदा देखील तुम्ही घेऊ शकता. या कलमाअंतर्गत 5 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर तुम्हाला 12,500 रुपयांची कर सवलत (tax relief) मिळते. यामुळं तुमचं करपात्र उत्पन्न कमी होईल. त्यानंतर तुम्हाला कोणताही कर भरावा लागणार नाही.

महत्त्वाच्या बातम्या

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More