Pune News | मध्यरात्री सुद्धा मिळणार दारु, 24 तारखेपासून ‘या’ वेळेपर्यंत सुरु राहणार दुकानं!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Pune News | 2023 साल संपत आलं आहे आणि 2024 या नवीन वर्षाची पहाट नागरिकांना लवकरच पहायला मिळणार आहे, मात्र तत्पर्वीच राज्य सरकारने थर्डी फर्स्ट तसेच नाताळ साजरा करणारांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. दारुच्या दुकानांच्या वेळा वाढवण्यात आल्या आहेत. पुण्यासंदर्भातील आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी गुरुवारीच जारी केले आहेत.

किती वाजेपर्यंत सुरु राहणार दारुची दुकानं?

ख्रिसमस तसेच तसेच थर्टी फर्स्टच्या (Thirty First Party) पार्श्वभूमीवर पुणे शहरासह राज्यभरात हौशी मंडळी पार्ट्या करत असतात. हौशी पार्ट्यांमध्ये दारु नसली तर कसली मजा?, त्यामुळे इअर एंडला दारुची मोठ्या प्रमाणात विक्री होताना पहायला मिळते. रात्री लवकर दुकानं बंद होतात त्यामुळे नागरिकांना लवकरच दारु घेऊन ठेवण्यासाठी कसरत करावी लागेत, मात्र आता अशी कसरत करण्याची गरज पडणार नाही.

पुणे शहरातील (Pune News) वाईन शॉप सुरु ठेवण्यासाठीच्या वेळेत आता वाढ करण्यात आली आहे. दिनांक 24 आणि 25 डिसेंबर तसेच 31 डिसेंबरच्या रात्रीसाठी नव्या वेळेचे नियम लागू असणार आहे. आधी सांगितलेल्या तिन्ही तारखांना रात्री साडेदहा वाजल्यापासून ते मध्यरात्री एक वाजेपर्यंत वाईन शॉप सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.

बीअर बारला पहाटे पाचपर्यंत सवलत-

वाईन्स शॉप्सला मध्यरात्री एक वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी असली तरी बीअर बारला मात्र पहाटे पाच वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे मद्यप्रेमींना रात्री उशिरापर्यंत मद्यसेवन करता येणार आहे. सरकारच्या या निर्णयाबद्दल मद्यप्रेमींकडून आनंद साजरा केला जात आहे.

पुण्याचे जिल्हाधिकारी (Pune News) डॉ. राजेश देशमुख (Dr. Rajesh Deshmukh) यांनी गुरुवारी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत. महाराष्ट्र दारुबंदी कायद्याच्या कलम 139 (I) (सी), कलम 142 (2), (एच-I) (आयव्ही) अन्वये नाताळ आणि नववर्षानिमित्त 24, 25 आणि 31 डिसेंबरला राज्यातील परवानाधारक मद्यविक्री विक्रेत्यांना वाईन शॉप तसेच बीअर बार रात्री उशिरापर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात येत असल्याचं या आदेशात म्हटलं आहे.

दरम्यान, पुणे शहरात वरील तीन दिवसांशिवाय अन्य दिवशी वाईन शॉप रात्री साडेदहा वाजेपर्यंतच उघडे ठेवण्यास परवानगी आहे, तसेच ग्रामीण भागात रात्री साडेअकरा वाजेपर्यंत मुदत आहे.

News Title: pune news liquor shops will remain open till 1am

महत्त्वाच्या बातम्या-

Aishwarya Rai ला मोठा धक्का! एक्स बॉयफ्रेंड सलमान आणि अभिषेक आले एकत्र

IND vs SA Test Series | Virat Kohli बाबत मोठी बातमी समोर!

SBI बँकेने ग्राहकांना दिली मोठी गुड न्यूज!

Aishwarya Rai चं घटस्फोट प्रकरण नाट्यमय वळणावर, घरातील व्यक्तीनेच केले गंभीर आरोप!

Salaar नं प्रदर्शनाआधीच मारली बाजी, शाहरुखच्या Dunki ला ‘या’ गोष्टीत टाकलं मागे!