Virat Kohli | भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघाच्या अडचणी वाढल्या आहेत. भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) दक्षिण आफ्रिकेतून अचानक मायदेशी परतला आहे.
Virat Kohli अचानक भारतात परतला
कौटुंबिक इमर्जन्सीमुळे विराट कोहली घरी परतला आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे. विराट कोहली टीम इंडियाच्या इंट्रा-स्क्वाडमध्येही सहभागी होऊ शकणार नाही. मात्र तो दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सेंच्युरियनमध्ये खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात खेळताना दिसणार आहे.
विराट कोहली दक्षिण आफ्रिकेत (IND vs SA कसोटी) चालू असलेल्या तीन दिवसीय इंट्रा संघात खेळला नाही, कारण त्याला काही कारणामुळे घरी परतावं लागलं. मात्र विराट कोहली 26 डिसेंबरपासून सेंच्युरियनमध्ये सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटीसाठी वेळेत परतेल, असं बीसीसीआयने म्हटलं आहे.
मोहम्मद शमी आधीच कसोटी मालिकेतून बाहेर आहे. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून आधीच बाहेर झाला आहे. एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये चमकदार कामगिरी करणारा मोहम्मद शमी फिटनेसमुळे कसोटी मालिका खेळू शकणार नाही.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट सीरीजमध्ये विराट कोहलीची महत्त्वाची भूमिका असेल. दक्षिण आफ्रिकेत कॅप्टन रोहित शर्माचा रेकॉर्ड खूप खराब आहे. त्यामुळे विराटवर जास्त जबाबदारी असेल.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2 कसोटी सामन्यांसाठी हे खेळाडू असणार संघात
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन, केएल राहुल, आर अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, प्रसिध्द कृष्णा.
महत्त्वाच्या बातम्या-
SBI बँकेने ग्राहकांना दिली मोठी गुड न्यूज!
Aishwarya Rai चं घटस्फोट प्रकरण नाट्यमय वळणावर, घरातील व्यक्तीनेच केले गंभीर आरोप!
Salaar नं प्रदर्शनाआधीच मारली बाजी, शाहरुखच्या Dunki ला ‘या’ गोष्टीत टाकलं मागे!
LPG Gas Price | सर्वसामान्यांसाठी मोठी आनंदाची बातमी, गॅस झाला ‘एवढ्या’ रुपयांनी स्वस्त!
CoronaVirus | जीव घेतोय नवा कोरोना, आतापर्यंत एवढ्या लोकांनी घेतला जगाचा निरोप!