LPG Gas Price | सर्वसामान्यांसाठी मोठी आनंदाची बातमी, गॅस झाला ‘एवढ्या’ रुपयांनी स्वस्त!

LPG Gas Price | सर्वसामान्य जनतेला नव्या वर्षाच्या तोंडावर एक मोठी आनंदाची बातमी मिळाली आहे. गॅसच्या किंमती ही सर्वसामान्य जनतेसाठी गेल्या काही वर्षांपासून डोकेदुखी ठरली होती, सतत वाढणाऱ्या गॅसच्या किंमतींमुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली होती, अखेर सर्वसामान्य जनतेला आता मोठा दिलासा मिळाला आहे. गॅसच्या किंमतींबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

गॅसच्या किंमती किती रुपयांची घटल्या?

ऑईल कंपन्यांनी गॅसच्या किंमती स्वस्त करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या 19 किलोग्राम वजनाच्या कमर्शियल गॅसच्या (LPG Gas Price) किंमतींमध्ये घट करण्यात आली आहे. हा गॅस तब्बल 39 रुपयांनी स्वस्त करण्यात आला आहे. सर्वसामान्य जनतेसाठी हा एक मोठा दिलासा मानला जात आहे. जाणून घेऊया सध्या कोणत्या शहरात या गॅसच्या किंमती किती रुपयांना आहेत.

कोणत्या शहरात गॅस किती रुपयांना?

कमर्शियल वापराच्या गॅस सिलेंडरच्या किंमतींमध्ये 39 रुपयांची घट झाल्याने सर्वसामान्यांच्या आनंदात वाढ झाली आहे. सध्या या गॅसच्या किंमती दिल्लीमध्ये 1757.50 रुपये, कोलकात्यामध्ये 1869 रुपये, मुंबईमध्ये 1710 रुपये तर चेन्नईमध्ये हाच गॅस 1929.50 रुपयांना मिळत आहे.

घरगुती गॅसच्या 200 रुपयांनी स्वस्त झालेला आहे-

कमर्शियल गॅसच्या किंमतींमध्ये 39 रुपयांची घट झाली असली तरी सध्या घरगुती गॅसच्या दरांमध्ये कुठलीही वाढ किंवा घट झालेली नाही. घरगुती गॅसच्या किंमतींमध्ये (LPG Gas Price) काही दिवसांपूर्वीच बदल करण्यात आले होते, सर्वसामान्यांना त्यावेळी मोठा दिलासा मिळाला होता.

घरगुती गॅसच्या किंमतींमध्ये शेवटचा बदल ऑगस्ट 2023 मध्ये झाला होता, तेव्हा घरगुती गॅसचे दर तब्बल 200 रुपयांनी कमी करण्यात आले होते. सरकारच्या या निर्णयामुळे त्यावेळी सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला होता.

दरम्यान,  IOCL च्या वेबसाइट वर दिलेल्या माहितीनूसार, घरगुती गॅसच्या किंमती देशातील महत्त्वाच्या शहरांमध्ये पुढीलप्रमाणे आहेत. दिल्लीमध्ये 903 रुपये, कोलकात्यामध्ये 929 रुपये तर मुंबईमध्ये घरगुती गॅसच्या किंमती 902.50 रुपये असल्याची माहिती आहे.

News Title: govt cuts lpg gas price

महत्त्वाच्या बातम्या-

CoronaVirus | जीव घेतोय नवा कोरोना, आतापर्यंत एवढ्या लोकांनी घेतला जगाचा निरोप!

सगळ्यांसमोर Aishwarya Rai ने अभिषेकसोबत केलं असं काही की…,व्हिडीओ होतोय व्हायरल

Sanju Samson | संजू सॅमसननं करुन दाखवलं… खूप दिवसांनंतर मिळालेल्या संधीचं केलं सोनं!

‘MS Dhoni नं ‘भारताच्या कायरन पोलार्ड’ला दिला होता शब्द; “कोणीच खरेदी केलं नाही, तर मी तुला खरेदी करणार!”

ऐश्वर्या-अभिषेकनंतर आता Ajay Devgn-Kajol च्या नात्यात दुरावा; ‘हा’ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत