CoronaVirus | जीव घेतोय नवा कोरोना, आतापर्यंत एवढ्या लोकांनी घेतला जगाचा निरोप!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

CoronaVirus | तीन वर्षापूर्वी जगभरात थैमान घातलेल्या कोरानाने (CoronaVirus) पुन्हा एकदा टेंशन वाढवलं आहे. कोरोनाच्या व्हेरियंट समोर आला असून तो वेगाने पसरत असल्याने चिंता वाढली आहे. कोरोनाच्या JN1 हा व्हेरियंट सापडल्याने देशातील आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. रूग्णसंख्येत वाढ होत असून अनेक लोकांनी आतापर्यंत जीव देखील गमावला आहे.

CoronaVirus | जीव घेतोय नवा कोरोना

गेल्या 24 तासात देशभरात कोरोना संसर्गामुळे 6 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 3 प्रकरणे एकट्या केरळमध्ये नोंदवली गेली आहेत. याशिवाय कर्नाटकात दोन आणि पंजाबमध्ये एका रुग्णाचा संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.

गेल्या दोन आठवड्यांवर नजर टाकली तर कोरोनामुळे मृतांचा आकडा 22 वर पोहोचला आहे. याशिवाय नवीन प्रकरणांमध्येही वाढ झाली आहे. कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता केंद्र सरकार आणि राज्य सरकार सर्वच कामाला लागले आहेत.

भारतात कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. मात्र, केरळ सर्वाधिक धोक्याच्या क्षेत्रात आहे. आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 358 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 300 कोरोनाची प्रकरणे एकट्या केरळमधील आहेत. विशेष म्हणजे गेल्या 24 तासात कोरोनामुळे 6 जणांचा मृत्यू झाल्याची बातमीही समोर आली आहे.

सध्या देशात 2669 सक्रिय रुग्ण आहेत. केरळमध्येच सक्रिय रुग्णांची संख्या 2341 वर पोहोचली आहे. कोरोना रूग्णाची वाढती आकडेवारी पाहता महाराष्ट्र सरकारही सावध झालं आहे. गोवा, केरळ आणि महाराष्ट्रामध्ये कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत.

सर्व नागरिकांनी आवश्यकतेनुसार गरजेच्या ठिकाणी मास्क घालणे, वारंवार हात धुणे आणि कोविड नियमांचे पालन करणं गरजेचे आहं. या नवीन व्हेरीयंटच्या पाश्र्वभूमीवर सर्व जिल्हयांना दक्षता घेण्याचे कळविण्यात आलं आहे. रुग्णांचे सर्वेक्षण अधिक सक्षम करण्यासाठीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

CoronaVirus तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला

कोरोनाच्या या नव्या व्हेरियंटबद्दल नागरिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे, मात्र या व्हेरियंटची लागण झाली तरी अजिबात घाबरु नका, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. हा विषाणू वेगाने पसरत असला तरी त्याची लक्षणे सौम्य स्वरुपाची आहेत. या आजाराचा रुग्ण एका आठवड्यात बरा होतो, त्यामुळे घाबरुन जाऊ नये, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

सगळ्यांसमोर Aishwarya Rai ने अभिषेकसोबत केलं असं काही की…,व्हिडीओ होतोय व्हायरल

Sanju Samson | संजू सॅमसननं करुन दाखवलं… खूप दिवसांनंतर मिळालेल्या संधीचं केलं सोनं!

‘MS Dhoni नं ‘भारताच्या कायरन पोलार्ड’ला दिला होता शब्द; “कोणीच खरेदी केलं नाही, तर मी तुला खरेदी करणार!”

ऐश्वर्या-अभिषेकनंतर आता Ajay Devgn-Kajol च्या नात्यात दुरावा; ‘हा’ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Corona JN1 | कोरोनाच्या नव्या व्हेरियंटची लक्षणं कोणती?, प्रसिद्ध डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती