Aishwarya Rai चं घटस्फोट प्रकरण नाट्यमय वळणावर, घरातील व्यक्तीनेच केले गंभीर आरोप!

मुंबई | बाॅलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आणि आपल्या सौंदर्यासाठी जगप्रसिद्ध असलेली ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. पती अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या नात्यामध्ये दुरावा आल्याच्या बातम्या होत्या. अजूनही तिच्या घटस्फोटाच्या बातम्या सुरुच असून बॉलिवूडमध्ये चर्चांना उधाण आलं आहे. दोघांच्या नात्याबद्दल रोज नवनवीन खुलासे बाहेर येत आहेत.

एकीकडे घटस्फोटाच्या चर्चा सुरु असताना दुसरीकडे बच्चन कुटुंबातील एका व्यक्तीने ऐश्वर्यावर काही आरोप लावले आहेत. ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून तिची सासू जया बच्चन आहेत. जया बच्चन यांच्या आरोपांची सध्या एकच चर्चा सुरु आहे.

जया बच्चन यांनी काय आरोप केले?

एका मुलाखतीमध्ये बोलत असताना, जया बच्चन यांनी ऐश्वर्यावर (Aishwarya Rai) काही आरोप केले आहेत. “ऐश्वर्याला जर कधी कोणती गोष्ट खटकली किंवा तिला ती गोष्ट पटली नसेल तर तिने ती गोष्ट स्पष्ट बोलावी”, असं म्हणत जया बच्चन यांनी ऐश्वर्याकडून अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. शिवाय ऐश्वर्याने कुटुंबातील सर्वांचा आदर, सन्मान करावा, असं देखील त्यांनी म्हटलं आहे.

ऐश्वर्याची ‘ही’ गोष्ट आवडते-

ऐश्वर्याची जर कोणती गोष्ट आवडत असेल तरी तिची एक सवय जया बच्चन यांना आवडते. त्याबद्दल जया बच्चन म्हणाल्या की, “ऐश्वर्याची एक सवय मला प्रचंड आवडते. सर्वांसमोर ती काहीही बोलत नाही हे मला भावतं”

“ती एका जागेवर शांत उभी राहते आणि सर्वांचं नीट ऐकते…’, या वक्तव्यानंतर जया बच्चन यांना ट्रोल करण्यात आलं होतं. जया बच्चन यांना ‘जुन्या विचारांची सासू”, असं नेटकरी म्हणाले होते, मात्र जया बच्चन यांनी आपलं स्पष्ट मत मांडलं आहे. ऐश्वर्यानं जास्त बोललेलं त्यांना आवडत नाही, त्यामुळे जया बच्चन यांना याच कारणामुळे लोकांचा रोष सहन करावा लागला होता.

बच्चन कुटुंबातील महत्त्वाचा नियम-

घरातील नियमांवर बोलत असताना अभिनेता अभिषेक बच्चन म्हणाला की, “आईने घरातील सर्वांसाठी एक महत्त्वाचा नियम ठरवला आहे. एक वेळचं जेवण सर्वांनी एकत्र करायलाच हवं, असा आईचा आग्रह असतो.” दरम्यान, ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या असल्या तरी दोघांच्या नात्यामधील दुराव्यावर बच्चन कुटुंबातील कुणीही भाष्य केलेलं नाही.

News Title : Family member put allegation on Aishwarya rai

थोडक्यात बातम्या-

LPG Gas Price | सर्वसामान्यांसाठी मोठी आनंदाची बातमी, गॅस झाला ‘एवढ्या’ रुपयांनी स्वस्त!

CoronaVirus | जीव घेतोय नवा कोरोना, आतापर्यंत एवढ्या लोकांनी घेतला जगाचा निरोप!

सगळ्यांसमोर Aishwarya Rai ने अभिषेकसोबत केलं असं काही की…,व्हिडीओ होतोय व्हायरल

Sanju Samson | संजू सॅमसननं करुन दाखवलं… खूप दिवसांनंतर मिळालेल्या संधीचं केलं सोनं!

‘MS Dhoni नं ‘भारताच्या कायरन पोलार्ड’ला दिला होता शब्द; “कोणीच खरेदी केलं नाही, तर मी तुला खरेदी करणार!”