Pune News | पुढील 48 तासात… पुण्यासह महाराष्ट्रातील ‘या’ भागांना थंडीबाबत महत्त्वाचा इशारा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Pune News | डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून राज्यात थंडीचा जोर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. तर काही ठिकाणी सकाळच्या वेळी ढगाळ वातावरण सुद्धा पहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी कडाक्याची थंडी देखील सुरु झाली आहे. तसेच काही शहरात तापमान सातत्याने 10 ते 14 अंश सेल्सिअस दरम्यान असल्याचं दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर हवामान विभागाने एक महत्त्वाची माहिती दिली आहे.

हवामान विभागाकडून आलेली माहिती-

यंदाच्या हिवाळ्याचा अंदाज पाहता हवामान विभागाने थंडीसंदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. पुढील 48 तासांत महाराष्ट्रात थंडी वाढणार असल्याचं हवामान विभागाने सांगितलं आहे. मुंबई, पुण्यात (Pune News) थंडी वाढणार असून हा जोर वर्षाच्या अखेरपर्यंत कायम राहणार आहे. अरबी समुद्रात वाऱ्यांची चक्रीय स्थिती निर्माण झाल्यामुळे थंडी निर्माण झाली आहे आणि ती आणखी वाढेल, असं हवामान विभागानं म्हटलं आहे.

पुणे शहरात थंडी वाढली-

राज्यात उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा प्रभाव जाणवण्याची शक्यता असून या वेळी तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे. पुणे (Pune News) शहरातही तापमानात घट होणार आहे, असं हवामान विभागाने सांगितलं आहे. तर मुंबईमध्ये तापमान सध्या 23.2 अंशावर आलं आहे ते आणखी कमी होण्याची शक्यता आहे.

विर्दभात सर्वात जास्त गारठा-

राज्यात सर्वात कमी तापमान विदर्भात नोंदवलं गेलं आहे. गोदिंयाचे तापमान 9 अंश सेल्सियसवर आलं आहे. नागपूरचे तापमान 10.6 तर नाशिकचे तापमान 15 अंश सेल्सियस नोंदवण्यात आले आहे.

दुसरीकडे डिसेंबरच्या महिन्याअखेरीस किमान तापमानात आणखी जास्त घट होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. हवामान विभागाच्या या इशाऱ्यामुळे थंडीची लाट आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

वाढत्या थंडीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आले आहे. उबदार कपडे वापरा तसेच गरज नसताना रात्रीच्या थंडीच्या कडाक्यात बाहेर पडू नका तसेच उष्ण आणि गरम खाण्याच्या पदार्थांचा आपल्या जेवणात समावेश करा, जेणेकरुन थंडीपासून स्वतःचं संरक्षण करता येईल, असं तज्ज्ञांचं मत आहे.

News Title : pune news cold temperature increase in next 48 hours

थोडक्यात बातम्या-

Aishwarya Rai ला मोठा धक्का! एक्स बॉयफ्रेंड सलमान आणि अभिषेक आले एकत्र

IND vs SA Test Series | Virat Kohli बाबत मोठी बातमी समोर!

SBI बँकेने ग्राहकांना दिली मोठी गुड न्यूज!

Aishwarya Rai चं घटस्फोट प्रकरण नाट्यमय वळणावर, घरातील व्यक्तीनेच केले गंभीर आरोप!

Salaar नं प्रदर्शनाआधीच मारली बाजी, शाहरुखच्या Dunki ला ‘या’ गोष्टीत टाकलं मागे!