Aishwarya Rai | ‘या’ कारणामुळे ऐश्वर्या झाली भावुक, सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाली…

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Aishwarya Rai | बाॅलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चा दिवसेंदिवस रंगत चालल्या आहेत. या दोघांच्या नात्यांबाबत रोज नवीन खुलासे पाहयला मिळत आहेत. काही दिवसांपूर्वी सासू जया बच्चन आणि नणंद श्वेता बच्चन यांनी ऐश्वर्याच्या चांगल्या वाईट सवयींचे खुलासे केले होते. या सगळ्या गोष्टी घडत असताना ऐश्वर्याने तिच्या नात्याबद्दल अणखी काहीच भाष्य केलेलं नाही. दरम्यान, ऐश्वर्याने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे.

ऐश्वर्याने कोणती पोस्ट शेअर केली?

आपल्या चाहत्यांसाठी ऐश्वर्या कायम नवनवीन फोटोज शेअर करत असते. तिच्या पोस्टमध्ये तिच्या लेकीबरोबरचे फोटो पहायला मिळत असतात. अशातच ऐश्वर्याने एक नवीन पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने तिच्या आई वडिलांचा फोटो शेअर केला आहे.

काय आहे नेमका प्रकार?

ऐश्वर्याच्या आई वडिलांचा आज लग्नाचा वाढदिवस आहे. या निमित्ताने तिने या दोघांचा फोटो शेअर करत त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

ऐश्वर्याचे वडील कृष्णाराज राय आणि आई ब्रिंद्या राय या दोघांचा जुना फोटो तिने पोस्ट केला आहे. 2017 मध्ये कृष्णाराज राय यांचं निधन झालं आहे. दोघांच्या फोटो खाली ऐश्वर्याने कॅप्शन पण लिहिलं आहे.

काय म्हणाली ऐश्वर्या?

या फोटोखाली ऐश्वर्याने लिहिलं आहे की, “खूप प्रेम, आई-बाबा आणि आजी-आजोबा, लग्नाच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप प्रार्थना आणि शुभेच्छा, देवाचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहो.” तिने केलेल्या या पोस्टला अभिनेता आणि पती अभिषेक बच्चन याने सुद्धा लाईक दिला आहे.  

News Title : Aishwarya rai shares news post on social media

थोडक्यात बातम्या-

Pune News | पुढील 48 तासात… पुण्यासह महाराष्ट्रातील ‘या’ भागांना थंडीबाबत महत्त्वाचा इशारा

Pune News | मध्यरात्री सुद्धा मिळणार दारु, 24 तारखेपासून ‘या’ वेळेपर्यंत सुरु राहणार दुकानं!

Aishwarya Rai ला मोठा धक्का! एक्स बॉयफ्रेंड सलमान आणि अभिषेक आले एकत्र

IND vs SA Test Series | Virat Kohli बाबत मोठी बातमी समोर!

SBI बँकेने ग्राहकांना दिली मोठी गुड न्यूज!