Pune-PCMC News | मनस्ताप नको असेल तर आत्ताच वाचा!, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये वाहतुकीत मोठा बदल

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Pune-PCMC News | पुणे जिल्ह्यातल्या हवेली तालुक्यातील पेरणे फाटा (Perne Phata) येथे दरवर्षी 1 जानेवारी या दिवशी विजयस्तंभ (Vijaystambha) अभिवादनाचा कार्यक्रम पार पडत असतो. यंदाची हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात नागरिक भीमा कोरेगाव (Bhima Koregaon) इथं जमत असतात. जयस्तंभ हा नगर-पुणे (Pune-Nagar Road) रस्त्याला खेटूनच असल्याने याठिकाणी मोठी वाहतुककोंडी होते, त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून या भागातील वाहतूक वळवण्यात येत आहे. त्यानूसार यंदाही या भागातील कार्यक्रमामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील वाहतुकीत मोठा बदल करण्यात आला आहे. वाहतुकीत करण्यात आलेले खालील बदल हे 31 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजल्यापासून ते 1 जानेवारीच्या मध्यरात्री 12 वाजेपर्यंत असणार आहे.

चाकण-शिक्रापूर तसेच सोलापूर रोडसाठी-

चाकण ते शिक्रापूर (Chakan-Shikrapur) आणि शिक्रापूर ते चाकण अशी दोन्ही बाजूने जाणाऱ्या आणि येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. ( फक्त अनुयायांच्या वाहनांना मुभा असेल) तसेच सोलापूर रोडवरुन (Solapur Road) आळंदी-चाकण भागात येणाऱ्या जड वाहनांना, माल वाहतूक टेम्पो तसेच ट्रक यांना हडपसर-मगरपट्टा-खराडी बायपास मार्गे विश्रांतवाडीवरुन आळंदीकडे तसेच देहू फाटा चौकातून डावीकडे वळून पुढे पुणे नाशिक रोडवरुन चाकण येथे जाता येईल.

मुंबईवरुन-अहमदनगरला जाण्यासाठी-

मुंबईकडून अहमदनगरकडे (Mumbai-Ahmednagar) जाणारी जड वाहने माल, वाहतूक टेम्पो तसेच ट्रक यांना वडगाव मावळ-एचपी चौक-म्हाळुंगे-वासोली फाटा- बिरदवडी गाव- रोहकल फाटा-पुणे नाशिक रोड-खेड-मंचर-नारायणगाव इथून पुढे आळेफाटा मार्गे अहमदनगरला जाता येईल, तसेच मुंबईकडून (Pune-PCMC News) अहमदनगरला जाणाऱ्या वाहनांसाठी वडगाव मावळ-एचपी चौक-म्हाळुंगे-वाघजाईनगर-बिरदवडी गाव-रोहकल फाटा-पुणे नाशिक रोड-खेड-मंचर-नारायणगाव-आळेफाटा या मार्गानेही पुढे अहमदनगर येथे जाता येईल. तर मुंबईहून अहमदनगरकडे जाणारी हलकी वाहने उदा. कार, जीप इत्यादी वाहनांमा वडगाव मावळ-चाकण चौक खेड-पाबळ मार्गे पुढे शिरुरवरुन अहमदनगरला जाता येईल.

आळंदी तसेच आसपासच्या परिसरात-

आळंदी-शेल पिंपळगाव-बहुळ-साबळेवाडी या गावांच्या दोन्ही बाजू होणारी सार्वजनिक तसेच खासगी प्रवासी वाहतूक पूर्णपणे बंद (Pune-PCMC News) करण्यात येणार आहे. (फक्त अनुयायांच्या वाहनांना प्रवासास मुभा असेल) तसेच आळंदी-मरकळवरुन लोणीकंदकडे जाणारी व येणारी सार्वजनिक तसेच खासगी प्रवासी वाहतूक देखील पूर्णपणे बंदी करण्यात येणार आहे. (महत्त्वाची सूचना-मरकळ गावात इंद्रायणी नदी पुलावर 9 फूट उंचीवर लोखंडी ओव्हरहेड बॅरिकेट लावलेले असल्याने येथून जास्त उंचीची वाहने जावू शकणार नाहीत. येथून फक्त अनुयायांच्या कमी उंचीच्या वाहनांना प्रवेश दिला जाईल.)

मुंबई हायवेवरुन येणाऱ्या नागरिकांसाठी-

मुंबईकडून देहूरोडकडे जाणाऱ्या लोकांसाठी पुणे-मुंबई (Mumbai-Pune Ex) हायवेने येणारी वाहतूक सेंट्रल चौकातून निगडी-पिंपरी चिंचवडकडे न जाता ती वाहतूक सेंट्रल चौकातून मुंबई-बेंगलोर हायवेने सरळ वाकड नाका-चांदणी चौकातून (Chandani Chowk) पुढे इच्छित स्थळी जाता येईल. (Pune-PCMC News)(फक्त अनुयायांच्या वाहनांना प्रवेश दिला जाईल) दुसरीकडे मुंबईकडून एक्सप्रेसवेने पुण्याकडे जाणारी वाहने उर्से टोलनाक्यावरुन मुंबई-बेंगलोर हायवेने (निगडी-मुकाई चौकाकडे न जाता) सरळ वाकड नाका व राधा चौकाकडून पुण्याला जाऊ शकतील.

एसटी गाड्यांच्या मार्गातही बदल-

सर्वात महत्त्वाची माहिती (Pune-PCMC News) अशी की, एसटी बसेसचे मार्ग देखील वळवण्यात आले आहेत. वरील बदल केलेल्या मार्गांनीच एसटी (ST Buses) गाड्या वळविण्यात येणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी मनस्ताप टाळण्यासाठी वरील वाहतुकीच्या बदललेल्या नियमांनूसार आपल्या प्रवासात बदल करण्याची सूचना वाहतूक पोलिसांनी दिल्या आहे. वाहतुकीतील हा बदल 31 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजल्यापासून ते 1 जानेवारी रोजी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत असणार आहे.

News Title: pune-pcmc news traffic major changes on 1st jan

महत्त्वाच्या बातम्या-

Aishwarya Rai | ‘या’ कारणामुळे ऐश्वर्या झाली भावुक, सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाली…

Pune News | पुढील 48 तासात… पुण्यासह महाराष्ट्रातील ‘या’ भागांना थंडीबाबत महत्त्वाचा इशारा

Pune News | मध्यरात्री सुद्धा मिळणार दारु, 24 तारखेपासून ‘या’ वेळेपर्यंत सुरु राहणार दुकानं!

Aishwarya Rai ला मोठा धक्का! एक्स बॉयफ्रेंड सलमान आणि अभिषेक आले एकत्र

IND vs SA Test Series | Virat Kohli बाबत मोठी बातमी समोर!