Weather Update | राज्यात थंडीचा मुक्काम आणखी वाढणार!, महत्त्वाची माहिती आली समोर

Weather Update | डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून थंडीने चांगलाच जोर धरला आहे. राज्यात आता पाहिजे तसा हिवाळा सुद्धा सुरु झाला आहे. अनेक ठिकाणी सकाळच्या सुमारास ढगाळ वातावरणाचं चित्र पहायला मिळतं. तर काही ठिकाणी धुक्क्याची चादर पहायला मिळत आहे. राज्यातील अनेक भागात ढगाळ वातावरणासह गार हवा सुद्धा जाणवत आहे. अचानक बदलेल्या वातावरणाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होताना दिसत आहे.

थंडी कायम राहणार?

सध्या सुरु असलेल्या थंडीचा अंदाज पाहता हवामान विभागाने एक महत्त्वाची माहिती दिली आहे. राज्यात किती दिवस थंडी असणार? याबाबत हवामान विभागाने (Weather Update) महत्त्वाची माहिती दिली आहे.

उत्तर भारतातील थंड वाऱ्यामुळे राज्याच्या तापमानात घट झाली आहे. विदर्भ, उत्तर महाराष्ट्रासह राज्यात गारठा कायम असून, किमान तापमानात चढ-उतार सुरुच आहे, असं हवामान विभागाने म्हटलं आहे. असं असलं तरी उत्तर भारतातील थंड वाऱ्यांमुळे येत्या काही दिवसात राज्यातील थंडी अशीच कायम राहणार आहेत, तसेच आणखी थंडी पडण्याची देखील शक्यता आहे.

मराठवाड्यात हवामानाचा अंदाज-

काही दिवसांपूर्वी मराठवाड्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला होता.  मात्र, मराठवाड्यात पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे आता मराठवाड्यात देखील चांगलीच थंडी सुरु झाली आहे.

मराठवाड्यातील परभणीमध्ये 8.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातला गारठा असाच कायम राहण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

विदर्भात थंडी राहणार?

राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार सुरू आहेत, मात्र विदर्भासह, उत्तर महाराष्ट्रात गारठा कायम आहे. या सोबतच धुळे, गडचिरोली, गोंदिया, जळगाव येथे तापमान 10 अंश किंवा त्यापेक्षा खाली गेलेलं आहे. दरम्यान, आज विदर्भासह राज्यात गारठा कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

News Title : weather update cold to remain in the state

थोडक्यात बातम्या-

Aishwarya Rai | ‘या’ कारणामुळे ऐश्वर्या झाली भावुक, सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाली…

Pune News | पुढील 48 तासात… पुण्यासह महाराष्ट्रातील ‘या’ भागांना थंडीबाबत महत्त्वाचा इशारा

Pune News | मध्यरात्री सुद्धा मिळणार दारु, 24 तारखेपासून ‘या’ वेळेपर्यंत सुरु राहणार दुकानं!

Aishwarya Rai ला मोठा धक्का! एक्स बॉयफ्रेंड सलमान आणि अभिषेक आले एकत्र

IND vs SA Test Series | Virat Kohli बाबत मोठी बातमी समोर!