नवख्या शेतकरीपुत्रानं राष्ट्रवादीच्या मातब्बर नेत्याला चारली पराभवाची धूळ
पुणे | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेच्या दहा जागांसाठीच्या निवडणुकीचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. सकाळी साडे आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली होती. या निवडणुकीत महाराष्ट्र विकास आघाडीला धूळ चारत विद्यापीठ विकास मंचने नऊ जागा जिंकत यश खेचून आणलंय.
निवडणुकीत विद्यापीठ विकास मंचच्या प्रवरेच्या सचिन गोर्डे पाटलांनी पुण्याच्या राष्ट्रवादीच्या मातब्बर नेत्याला पराभूत केलं आहे.
राष्ट्रवादीच्या महेंद्र पठारे यांचा तब्बल 7 हजार 900 मतांनी सचिन शिवाजीराव गोडेॅ पाटलांनी पराभव केलाय. राष्ट्रवादीच्या मातब्बर नेत्याचा राजकारणात नवख्या असलेल्या गोर्डेंनी पराभव केलाय.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या निवडणुकीत एकत्र आलेल्या कॉग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला नामुष्कीजनक पराभवाला सामोरं जावं लागलं आहे.
गोडेॅ यांच्या विजयाने अनेक तळागाळातील युवकांचा आवाज त्यांच्या माध्यमातून विद्यापीठापर्यंत पोहचणार असल्याची भावना यावेळी तरुण वर्गाने पत्रकारांशी बोलताना व्यक्त केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
Comments are closed.