Vehicle Owner Details l वाहन क्रमांकावरून समजेल वाहन मालकाचे नाव! जाणून घेण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Vehicle Owner Details l कित्येकदा गाडी रस्त्यामध्ये उभा करून गाडी मालक किंवा ड्रायव्हर बाहेर गेले असल्याने आपल्याला रस्ता पार करणे शक्य होत नाही. तसेच गाडी चालवताना किंवा इतर कोणत्याही परिस्थितीत समोरच्या व्यक्तीच्या गाडीच्या नंबरवरून तुम्हाला गाडीच्या मालकाचे नाव शोधावे वाटते, पण तुम्हाला ते जमत नाही.

घरबसल्या गाडीच्या नंबरवरून गाडी मालकाचे नाव कळणार! :

मात्र ते शक्य आहे. आपण घरबसल्या (Vehicle Owner Details) ही माहिती सहजरित्या मिळवू शकतो. तर घरबसल्या गाडीच्या नंबरवरून गाडी मालकाचे नाव काय आहे हे कसे पाहता येईल व याची प्रोसेस काय आहे हे जाणून घेऊयात…

कार क्रमांकावरून वाहनाच्या मालकाची माहिती मिळवण्याचे दोन मार्ग आहेत. एकतर तुम्ही ही माहिती एसएमएसद्वारे माहिती मिळवू शकता किंवा थर्ड पार्टी अ‍ॅप्स डाउनलोड करून माहिती मिळवू शकता. या दोन्ही पद्धतीद्वारे माहिती कशाप्रकारे काढू शकतो याबद्दल जाणून घेणार आहोत.

SMS द्वारे माहिती मिळवा (Vehicle Owner Details) :

जर तुम्हाला एखाद्या गाडीची माहिती मिळवायची असेल तर तुम्ही SMS द्वारे माहिती मिळवू शकता. यासाठी तुम्हाला सर्वप्रथम फोनमध्ये 7738299899 हा नंबर सेव्ह करावा लागेल.

त्यानंतर हा नंबर फोनमध्ये सेव्ह (Vehicle Owner Details) केल्यानंतर एसएमएस पाठवण्यासाठी, मेसेज पाठवताना ‘VAHAN’ असे लिहून व त्यानंतर एक स्पेस देऊन वाहन क्रमांक लिहून वर नमूद केलेल्या क्रमांकावर पाठवावा लागेल. मेसेज पाठवल्यानंतर तुम्हाला एक मेसेज येईल ज्यामध्ये तुम्हाला आवश्यक माहिती मिळेल.

Vehicle Owner Details l थर्ड पार्टी अ‍ॅप्सची मदत घ्या :

असे काही थर्ड पार्टी अ‍ॅप्स आहेत ते तुम्हाला तुमच्या व इतरांच्या वाहनाच्या मालकाचे नाव शोधण्यात मदत करू शकतात. तसेच वाहन क्रमांक टाकून कारच्या (Vehicle Owner Details) मालकाचे नाव, कारची आरटीओमध्ये नोंदणी केव्हा झाली, कार कोणत्या आरटीओमध्ये नोंदणीकृत आहे, तो पहिला मालक आहे की दुसरा मालक, कारचे मॉडेल काय आहे. आणि कार किती जुनी आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरे फक्त एकाच नंबरवर मिळू शकतात.

Google Play Store आणि Apple App Store वर तुम्हाला कार माहिती आणि Bike Info या सारखी अनेक अ‍ॅप्स मिळतील. हे अँप्स तुम्हाला वापरून माहिती मिळवता येऊ शकते.

टीप : थर्ड पार्टी अ‍ॅप्स डाउनलोड करताना काळजी घ्यावी. थर्ड-पार्टी अ‍ॅप्स अनेक प्रकारच्या परवानग्या मागतात जे योग्य नाही. कारण अशा परिस्थितीत डेटा लीक होण्याचा धोका असतो.