IND vs ENG कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा, बड्या खेळाडूला डच्चू नव्या चेहऱ्याची एन्ट्री

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

IND vs ENG | भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांची मालिका 25 जानेवारीपासून सुरू होणार आहे. यासाठी बीसीसीआयने (भारतीय क्रिकेट नियामक मंडळ) टीम इंडियाच्या 16 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. मात्र BCCI ने हा संघ फक्त पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी जाहीर केला आहे. यावेळी BCCI ने भारत विरुद्ध इंग्लंड या सामन्यातील कर्णधार पदाची धुरा रोहित शर्मावर सोपवली आहे. याशिवाय उपकर्णधार पदाची धुरा वेगवान गोलंदाज जसप्रीतवर सोपवली आहे.

IND vs ENG | या युवा खेळाडूला मिळाले संघात स्थान :

याशिवाय भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांत केएल राहुलसह, आणखी एका 22 वर्षीय खेळाडूचाही यष्टीरक्षक म्हणून संघात समावेश करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशकडून खेळणारा 22 वर्षीय यष्टीरक्षक-फलंदाज ध्रुव जुरेलचा प्रथमच राष्ट्रीय संघात समावेश करण्यात आला आहे. केएल राहुल-केएस भरत यांच्यानंतर संघात यष्टीरक्षक म्हणून तो तिसरा पर्याय असणार आहे असे BCCI ने सांगितले आहे.

या दिग्गज खेळाडूंना वगळले :

चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे या अनुभवी फलंदाजांना भारत विरुद्ध इंग्लंड या मालिकेत स्थान मिळालेले नाही. याशिवाय विकेटकिपर इशान किशनचाही संघात समावेश करण्यात आलेला नाही. तसेच गोलंदाज मोहम्मद शमी अजूनही पूर्ण फिट नसल्यामुळे त्याला पहिल्या दोन सामन्यांत स्थान दिलेलं नाही. मात्र शमी तिसऱ्या कसोटीपासून टीम इंडियाचा भाग असण्याची संभाव्यता आहे.

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिल्या दोन कसोटी सामन्यात वेगवान गोलंदाज आवेश खानला संघात संधी मिळाली आहे. विचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांच्याशिवाय कुलदीप यादवचाही संघात समावेश करण्यात आला आहे.

IND vs ENG | पहिल्या 2 कसोटी मालिकेत भारतीय संघाचे शिलेदार :

रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद यादव, मुकेश कुमार, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक) आणि आवेश खान.

कसोटी मालिकेसाठी इंग्लंडचे शिलेदार :

बेन स्टोक्स (कर्णधार), रेहान अहमद, जेम्स अँडरसन, गस ऍटकिन्सन, जॉनी बेअरस्टो (विकेटकीपर), शोएब बशीर, हॅरी ब्रूक, जॅक क्रॉली, बेन डकेट, बेन फॉक्स, टॉम हार्टले, जॅक लीच, ऑली पोप, ऑली रॉबिन्सन, जो रूट, मार्क वुड.

महत्त्वाच्या बातम्या- 

Don 3 | ‘सीरियल किसर ‘पुन्हा दाखवणार जादू; इमरान हाश्मी खलनायकाच्या भूमिकेत दिसणार

Munawar Faruqui | ‘एकाच वेळी दोन मुलींना…’, मुनव्वर फारूकीवर गंभीर आरोप

Astro Tips | श्रीमंत व्हायचंय?, ‘या’ सवयी पाळा, कधीच भासणार नाही पैशांची कमी

First Flying Car Booking l Traffic Jam ला टाटा बायबाय!; आता आली जगातील पहिली उडणारी कार, ‘या’ तारखेपासून बुकिंग सुरु

Voter ID Card l मतदानकार्ड वरील फोटो आणि पत्ता बदलायचा आहे? अशाप्रकारे घरबसल्या करा अपडेट