Munawar Faruqui | ‘एकाच वेळी दोन मुलींना…’, मुनव्वर फारूकीवर गंभीर आरोप

Munawar Faruqui | ‘बिग बॉस 17’ (Bigg Boss 17) हा शो अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्या भांडणामुळे अधिकच चर्चेत आहे. बिग बॉसच्या घरात रोज काही ना काही वाद होतच असतात. विकी आणि अंकिता बरोबरच शो मधील मुनव्वर फारूकी (Munawar Faruqui) हा देखील कायम चर्चेत राहणारा स्पर्धक ठरला आहे. आता नुकताच त्याच्याबाबत एक मोठा खुलासा झाला आहे. मुनव्वर बिग बॉस मध्ये कायमच आपल्या रिलेशनशिपमुळे चर्चेत राहिला आहे. त्यातच आता आयशाने (Ayesha Khan) मुनव्वर हा एकाच वेळी दोन मुलींना डेट करत असल्याचा मोठा खुलासा केल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.

आएशा खानचे Munawar Faruqui वर गंभीर आरोप

मुनव्वर फारूकी (Munawar Faruqui) हा त्याची एक्स गर्लफ्रेंड नाजिलाला धोका देत एकाचवेळी दोन मुलींना डेट करत असल्याचं आयशाने म्हटलं आहे. यावर मुनव्वरनेही आपली बाजू मांडत नाजिलालाच दोषी ठरवलं. बिग बॉसच्या अपकमिंग एपिसोडमध्ये आएशा आणि मुनव्वर यांच्यात शाब्दिक चकमक झाल्याचं दिसून येतं. याचा प्रोमो नुकताच रिलीज झाला आहे. या अपकमिंग एपिसोडमध्ये मुनव्वरच्या आयुष्यातील अनेक रहस्य उलगडली आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)

मुनव्वरने स्वतः आपण एक्स गर्लफ्रेंड नाजिलाला धोका दिल्याचे म्हटले. नाजिलाने मला धोका दिल्यामुळेच मी दुसऱ्या मुलीसोबत नात्यात जाण्याचा निर्णय घेतला. नाजिलाला आमच्या मुलासोबत राहायचे नव्हते म्हणून ती मला कायम भांडत होतो. बऱ्याचदा तिने माझ्या बहिणीबद्दलही अपशब्द वापरले आहेत. त्यामुळे मी नाजिलासोबत ब्रेकअप केल्याचे मुनव्वरने (Munawar Faruqui) सांगितले. यावर नाजिलानेही सोशल मिडियावर पोस्ट करत ‘आपल्या बचावासाठी कुणी किती खोटे बोलू शकते.’, असे म्हटले आहे.

मुनव्वर फारूकीने मागितली माफी |

मुनव्वरने (Munawar Faruqui) आयशाच्या आरोपांनंतर सर्व चूक नाजिलावर थोपटून दिल्याने तो अजूनच चर्चेत आला आहे. आयशाने सांगितले की, जेव्हा मुनव्वर नाजिला आणि तिच्यासोबत डबल डेट करत होता, तेव्हा त्याने एका फेमस इंफ्लुएंसर मुलीला लग्नाचा प्रस्ताव पाठवला होता. तिच्यासोबत तो चंदीगडला गेला होता.असा आरोप आएशाने केला आहे.

आएशाने मुनव्वर बद्दल केलेल्या या खुलास्यामुळे सर्वानाच धक्का बसला आहे. मुनव्वरने आयशाला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र, ती प्रचंड रागात होती. यानंतर दुसऱ्या दिवशी मुनव्वरने (Munawar Faruqui) आयशाची माफीही मागितली. मात्र, मुनव्वरवर केलेल्या या आरोपामुळे बिग बॉस आता चर्चेत आले आहे.

दरम्यान, बिग बॉसचा (Bigg Boss 17)हा सतरावा सीजन आता अंतिम फिनालेकडे वाटचाल करत आहे. येत्या 28 जानेवारीला याच्या विजेत्याची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. मात्र, त्यापूर्वीच मुनव्वरबद्दलच्या या खुलास्यामुळे बिग बॉसच्या घरातील वातावरण चांगलेच तापले आहे.

News Title-  Big reveal about Munawar Faruqui

महत्त्वाच्या बतम्या- 

High Blood Pressure | BP चा त्रास होत असेल तर ‘ही’ फळे खा, BP कंट्रोलमध्येच राहिल

धक्कादायक! Sharad Mohol च्या हत्येअगोदर आरोपींनी ‘या’ ठिकाणी केला होता सराव

Neetu Kapoor | ऋषी कपूर यांच्याबाबत नीतू कपूर यांचा धक्कादायक खुलासा!

Dhananjay munde | महिला नेत्याचा धनंजय मुंडेंवर अत्यंत गंभीर आरोप; राजकारणात खळबळ  

Mukesh Ambani | “…तर अँटिलियाचा गाशा गुंडाळा आणि गुजरातला जा”