High Blood Pressure | BP चा त्रास होत असेल तर ‘ही’ फळे खा, BP कंट्रोलमध्येच राहिल

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

High Blood Pressure | आजकाल अनेकांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास होताना दिसून येतंय. लहान मुले असो किंवा मोठे सर्वांनाच फास्ट फूड खायला प्रचंड आवडतं. मात्र याच फास्ट फूडमुळे लवकर वजन वाढतं आणि अधिकचं वजन म्हणजेच हाय ब्लडप्रेशरला निमंत्रण असतं. त्यातच रोज व्यायाम न करणं, स्मोकिंग आणि मद्यपान करणं या कारणांमुळे हाय ब्लड प्रेशरची समस्या उद्भवते. त्यातच ताण-तणाव हे हाय ब्लड प्रेशरचं (High Blood Pressure) मुख्य कारण समजलं जातं.

धावपळीच्या जगात सामाजिक तसेच मानसिक आणि वैयक्तिक कारणांमुळे प्रत्येकाला ताण-तणावाला सामोरं जावं लागतं. मात्र हा अधिकचा ताण-तणाव शरीराचं ब्लड प्रेशर वाढवतं. आपला ब्लडप्रेशर नॉर्मल ठेवायचा असेल तर या सर्व घटकांना टाळायला हवंच. मात्र यासोबतच योग्य आहार घेणंही आवश्यक असतं. यात काही फळांचा समावेश केला तर काही प्रमाणात ब्लड प्रेशर नॉर्मल होण्यास मदत मिळू शकतं.

हाय ब्लड प्रेशर शरीरासाठी हानिकारक

केळी हाय ब्लड प्रेशर (High Blood Pressure) नियंत्रण करण्यासाठी उपयुक्त ठरते. तज्ञांच्या मते, पोटॅशियम युक्त आहार ब्लडप्रेशरला नॉर्मल ठेवण्यास मदत करते आणि केळी या फळामध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते. पोटॅशियम हे रक्तवाहिन्यांमधील ताण कमी करते तसेच पोटॅशियम रक्तवाहिन्या रुंद करण्यास आणि विस्तृत करण्यासही मदत. त्यामुळे शरीराचा रक्तदाब हा नॉर्मल राहण्यास मदत होते.

हाय ब्लड प्रेशर असणाऱ्या व्यक्तींनी आहारामध्ये पोटॅशियमचे प्रमाण वाढवायला हवे. यासाठी केळी हे फळ अत्यंत उपयुक्त असे ठरते.मात्र अधिकचे पोटॅशियम घेतल्याने शरीराला नुकसान होऊ शकते. त्यामुळे डॉक्टरांच्या योग्य सल्ल्यानुसारच याचे सेवन करायला हवे. केळी फक्त रक्तदाबच नाही तर बद्धकोष्ठतेलासाठीही उपयुक्त अशी आहे. केळीमुळे आतड्यांसंबंधी समस्या दूर होते. केळीही शरीराला लगेच ऊर्जा प्रदान करते.

‘ही’ फळे ठरतील उपयुक्त

हाय ब्लड प्रेशर हृदयाच्या समस्या निर्माण करू शकते. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या शरीरकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. फास्ट फूड ऐवजी सकस आहार घ्यायला अधिक महत्व द्यायला हवे. ताण कमी घ्यायला हवा. कारण, ताण-तणाव इतर समस्याही निर्माण करू शकते. त्यामुळे निरोगी लाईफस्टाइल साठी वैयक्तिक पातळीवर नेहमी प्रयत्न कारायले हवे.

हाय ब्लड प्रेशर (High Blood Pressure ) नियंत्रित ठेवण्यासाठी केळी सोबतच डाळींब, बेरी, टोमॅटो, दही ही पदार्थही उपयुक्त ठरतात. तसेच, सफरचंद, किवी ही फळेही आरोग्यासाठी लाभदायक असतात. मात्र, या त्रासावर डॉक्टरांकडून योग्य उपचार घेऊन त्यांच्या सल्ल्यानेच सर्व उपचार करायला हवेत.

News Title- Health tips for High Blood Pressure

महत्त्वाच्या बतम्या- 

Dhananjay munde | महिला नेत्याचा धनंजय मुंडेंवर अत्यंत गंभीर आरोप; राजकारणात खळबळ  

Mukesh Ambani | “…तर अँटिलियाचा गाशा गुंडाळा आणि गुजरातला जा”

Shahrukh Khan | ‘तेव्हाच कानाखाली…’; मुलगा आर्यन खानच्या अटकेवर शाहरुखचं मोठं वक्तव्य

Sharad Mohol | मुळशीतच झालं होतं प्लॅनिंग, शरद मोहोळ हत्येप्रकरणी मोठी माहिती समोर

Rohit Pawar Talathi Bharti l बापरे! हा बडा नेता रोहित पवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करणार