Shahrukh Khan | ‘तेव्हाच कानाखाली…’; मुलगा आर्यन खानच्या अटकेवर शाहरुखचं मोठं वक्तव्य

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Shahrukh Khan | बॉलीवुडचा सुपरस्टार शाहरुख खानसाठी 2023 वर्ष खूपच शानदार राहिले. त्याच्या पठाण, जवान, डंकी या सुपरहीट चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. या तिन्ही चित्रपटांनी वर्ल्ड वाईड अंदाजे 2500 कोटींपेक्षाही अधिक गल्ला कामावला. या यशापूर्वी शाहरुख आणि त्याचे कुटुंब एका मोठ्या वादात अडकले होते.

शाहरुखचा (Shahrukh Khan) मुलगा आर्यन खान हा ड्रग्सप्रकरणी चर्चेत होता. या काळात मुलामुळे शाहरुखवर बरीच टीका करण्यात आली. 2022 मध्ये आर्यनला या प्रकरणातून सुटका तर मिळाली पण, या कठीण काळात त्यांना बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागले. मात्र शाहरुखने पुन्हा मोठे चित्रपट करत वापसी केली. नुकताच त्याने आर्यन खान प्रकरणी मोठा खुलासा केला. यावर त्याने पहिल्यांदाच भाष्य केले आहे.

“अत्यंत वाईट आणि त्रासदायक…”

मुलगा आर्यन खानच्या अटकेवर शाहरुखने (Shahrukh Khan) पहिल्यांदाच खुलासा केला. हे संपूर्ण प्रकरण अत्यंत वाईट आणि त्रासदायक असल्याचे त्याने सांगितले. आपण काही क्षणी मौन ठवलं पहिले. अगदी खूप शांत राहिले पाहिजे आणि सन्मानाने खूप मेहनत केली पाहिजे. जेंव्हा आपल्याला वाटते की, सर्वकाही व्यवस्थितपणे सुरू आहे तेंव्हाच जिंदगी आपल्या कानशिलात लगावतं, असं म्हणत या कठीण प्रसंगातून माझ्या कुटुंबाने मोठा धडा घेतल्याचं शाहरुख म्हणाला.

तसेच पुढे तो म्हणाला की, “पठाण, जवान आणि ‘डंकी’ला मिळालेलं यश माझ्यासाठी चाहत्यांच्या पाठिंबाच होता. यात मी हीरो होतो म्हणून, लोकांनी चित्रपट नाही पाहिला, तर लोकांनी केवळ मला पाठिंबा देण्यासाठी हे चित्रपट उत्साहाने पाहिले. लोकांना माझा अभिनय आवडला नसला तरी त्यांनी चित्रपट गृहात जाऊन माझा चित्रपट पाहिला. हेच माझं सर्वांत मोठं यश आहे, असं मत यावेळी शाहरुखने (Shahrukh Khan) मांडलं.

आर्यन खान प्रकरण नेमकं काय होतं?

दोन वर्षांपूर्वी म्हणजेच 2 ऑक्टोबर 2021 रोजी आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनसवर मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कार्डेलिया क्रूझवर छापा टाकण्यात आला होता. यावेळी पाच ग्रॅम मेफ्रेडॉन, 13 ग्रॅम कोकेन, 21 ग्रॅम चरस, एमडीएमएच्या 22 गोळ्या आणि एक लाख 33 हजारांची रोकड जप्त केली होती.

या प्रकरणात एनसीबीने या क्रूझवरून शाहरुख खानचा (Shahrukh Khan) मुलगा आर्यन खानसह आठ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. यानंतर एनसीबीनं याप्रकरणी आर्यन खानसह अन्य आरोपींविरोधात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला होता.

News Title- ShahRukh Khan big reveal

महत्त्वाच्या बतम्या- 

Sharad Mohol हत्येप्रकरणी आणखी एक नवा खुलासा!

Oppo Find X7 Ultra l जगातील सर्वात मोठा टेलिफोटो सेन्सर असलेला OPPO Find X7 सीरीज लाँच; जाणून घ्या किंमत

Ujjwal Nikam | कायदेतज्ज्ञ उज्वल निकम यांचा ठाकरे गटाला महत्त्वाचा सल्ला!

Hero Mavrick 440 l Royal Enfield सोबत स्पर्धा करण्यासाठी Hero Mavrick 440 बाईक या तारखेला होणार लाँच!

Induction Cooking Tips l स्वयंपाक करण्यासाठी इंडक्शनचा वापर करताय? तर या 4 गोष्टी लक्षात ठेवा अन्यथा होईल मोठे नुकसान